टोयोटा मोटर्स लवकरच भारतातील प्रसिद्ध एमपीव्ही इनोव्हा क्रिस्टा नव्या रुपात लाँच करणार आहे. यामध्ये नवे डिझाईन, फिचर्स आणि नवीन इंजिन देण्यात येणार आहे. जपानी दिग्गज ऑटो कंपनीने इनोव्हा क्रिस्टाच्या बुकिंगलाही सुरुवात केली आहे.
Toyota Motor ने अद्याप Inova Crysta 2023 मॉडेलची किंमत जाहीर केलेली नाही. पुढील महिन्यात ही कार अधिकृतपणे लाँच होण्याची शक्यता आहे. टोयोटाने आधीच इनोव्हाची डिझेल आवृत्ती बंद केली आहे. काही महिन्यांपूर्वी हायब्रीड इंजिन लाँच केले आहे. आता पुन्हा डिझेल इंजिनची इनोव्हा येणार आहे. बुकिंगसाठी ५० हजार रुपये टोकन घेतले जात आहे.
नवीन अवतारातली इनोव्हा क्रिस्टाचे डिझाईन अनेक महत्वाचे बदल करून आणले जाणार आहे. याचा फ्रंट लूकदेखील खूप बदलला जाणार आहे. ही कार जुन्या क्रिस्टापेक्षाही जास्त मजबूत असेल असे म्हटले जात आहे. या फॅमिली कारचा नवीन लुक एसयुव्ह फॉर्च्युनरसारखा असणार आहे.
नवीन इनोव्हा क्रिस्टा G, GX, VX आणि ZX या 4 मॉडेलमध्ये उपलब्ध असेल आणि 7 किंवा 8 सीटर क्षमतेसह येईल. टोयोटा एमपीव्ही 5 रंगांत येईल. हे रंग व्हाइट पर्ल क्रिस्टल शाइन, सुपर व्हाइट, सिल्व्हर, अॅटिट्यूड ब्लॅक आणि अवंटा गार्डे ब्रॉन्ज आहेत.
यात 8-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले मिळेल, जो Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करतो. कारमध्ये TFT ड्रायव्हर डिस्प्ले, वन टच टंबल सेकंड रो सीट्स, डिजिटल डिस्प्लेसह मागील ऑटो एसी, 8-वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, स्मार्ट एंट्री सिस्टम, सीट बॅक टेबल आणि अॅम्बियंट लाइटिंग मिळेल. अपहोल्स्ट्री ब्लॅक आणि कॅमल टॅन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये दिली जाईल.
टोयोटाच्या नवीन इनोव्हा क्रिस्टामध्ये अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्स पाहायला मिळतील. यामध्ये 7 एअरबॅग्ज, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, व्हीकल स्टेबिलिटी कंट्रोल और हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल, एबीएस, ईबीडी और ब्रेक असिस्ट (बीए) -पॉइंट सीट बेल्ट आणि हेडरेस्ट सारख्या सुरक्षा प्रणाली असतील.