Toyota Innova चे पुढचे मॉडेल लवकरच भारतीय रस्त्यांवर येणार आहे. टोयोटा इनोवा हायक्रॉस येत्या २५ नोव्हेंबरला लाँच होणार आहे. २१ नोव्हेंबरला इंडोनेशियात डेब्यू होणार आहे. तेथील इनोव्हाचे नाव Innova Zenix असे ठेवण्यात आले आहे. परंतू भारतातील किंमतींचा खुलासा जानेवारी २०२३ मधील ऑटो एक्स्पोमध्येच केला जाणर आहे.
नवीन पिढीतील इनोव्हा भारतीय रस्त्यांवर अनेक वेळा चाचणी करताना दिसली आहे. टोयोटा इंडोनेशियाने 3-रो MPV चा टीझर रिलीज केला आहे. नवीन टोयोटा इनोव्हा हायक्रॉसमध्ये दक्षिण आशियाई बाजारात आलेल्या Avanza (Avanza) MPV सारखीच दिसते.
नवीन हेडलॅम्प सेटअप देण्यात आला आहे. दोन एल-आकाराचे इन्सर्ट दिसत आहेत. बंपरला त्रिकोणी फॉग लॅम्प्स आणि बंपरला स्टॉन्ग क्रीज दिसत आहे. नवीन मॉडेल क्रॉसओवर-एमपीव्ही म्हणून आणण्याची शक्यता आहे. MPV ला LED ब्रेक लाइट्स आणि 10-स्पोक अलॉय व्हील, स्पोक लाईट देण्यात आल्या आहेत. 2,850 मिमी व्हीलबेस असेल आणि लांबी 4.7 मीटर असेल. 360-डिग्री कॅमेरे, फॅक्टरी-फिट केलेले इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, दुसऱ्या रांगेतील कॅप्टन सीटसाठी 'ऑटोमन फंक्शन' असेल.
ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेक, लेन डिपार्चर वॉर्निंग, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, प्री-कोलिजन सिस्टीम, रोड साइन असिस्ट, डायनॅमिक रडार क्रूझ कंट्रोल आणि ऑटोमॅटिक हाय बीम यांसारखी वैशिष्ट्ये असतील. RWD (रीअर-व्हील ड्राइव्ह) मधून FWD (फ्रंट-व्हील ड्राइव्ह) सेटअपमध्ये रुपांतरीत केले जाईल. स्ट्राँग हायब्रीड तंत्रज्ञानासह 2.0-लिटर पेट्रोल आणि 2.0-लिटर पेट्रोल असे दोन इंजिन पर्याय दिले जातील.