शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Visarjan 2024 Live: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; पुण्यात विसर्जन मिरवणूक रखडली
2
"दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार"; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा
3
नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारचा भीषण अपघात; समीर खान गंभीर जखमी
4
EPFO News : EPFO मध्ये मोठ्या बदलाचे सरकारचे संकेत, फायदा होणार की नुकसान? पाहा संपूर्ण डिटेल्स
5
पेजर हॅक झाले की मोसादने कंपन्यांसोबत डील केली; लेबनॉन बॉम्बस्फोटानंतर प्रश्न उपस्थित
6
सूरजला ओळखता येईना पाणगेंडा, अंकिताला विचारतो दिसतो कसा? टास्कदरम्यानचा व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू
7
आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२४; खूप मोठा आर्थिक लाभ होईल, यश व कीर्ती वाढेल
8
ममता बॅनर्जी यांना कोर्टाने फटकारले! महिला डॉक्टरांना नाईट शिफ्टपासून रोखू नका
9
देशभरातील बुलडोझर कारवाईवर बंदी, आमच्या आदेशाशिवाय बांधकामे पाडू नका: सर्वोच्च न्यायालय
10
राजधानीत 'आतिशी 'बाजी, केजरीवाल यांचा राजीनामा; आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार
11
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
12
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
13
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
14
अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड
15
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
16
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
17
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
18
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
19
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
20
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश

मोठा Sunroof अन् आकर्षक फिचर्स! सीटवर बसल्या बसल्या पाहा आकाश, येतेय नवी Innova Hycross

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 9:20 AM

Toyota Innova Hycross Launch Details: टोयोटा कंपनी आपल्या लोकप्रिय एमवीपी Innova कारला आता पूर्णपणे नव्या अवतारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

Toyota Innova Hycross Launch Details: टोयोटा कंपनी आपल्या लोकप्रिय एमवीपी Innova कारला आता पूर्णपणे नव्या अवतारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं नुकतंच आपल्या नव्या Innova Zenix चे काही टीझर लॉन्च केले होते. या कारची वैशिष्ट्ये देखील समोर आली आहे. आता हिच कार भारतीय बाजारपेठेत Innova Hycross नावानं सादर केली जाण्याची दाट शक्यता आहे. कंपनीनं आगामी हायक्रॉसचा एक टिझर देखील लॉन्च केला. यातून नवी इनोवा कार पॅनारोमिक सनरुफसह लॉन्च होणार असल्याचं दिसून येत आहे. 

रिपोर्टनुसार, इनोव्हा हायक्रॉस २१ नोव्हेंबर रोजी इंडोनेशियाच्या बाजारात लॉन्च केली जाणार आहे. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारात लॉन्च होईल. टोयोटा इंडोनेशियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर नव्या इनोवाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यात मोठ्या आकाराचं पॅनारोमिक सनरुफ पाहायला मिळत आहे. टोयोटा इनोवामध्ये सनरुफ ऑफर केलं जाण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. याआधी कंपनीनं Innova Crysta मध्ये स्टँडर्ड साइज सनरुफ दिलं होतं. तर फर्स्ट जनरेशन मॉडलमध्येही सनरुफ नव्हतं. 

Toyota Innova Hycross मध्ये कार असणार खासलॉन्चची तारीख जवळ येतेय तसं तसं या कार संबंधी नवी माहिती देखील दिली जात आहे. नव्या इनोवामध्ये कंपनी सनरुफसोबतच तिसऱ्या रांगेतील पॅसेंजर्ससाठी एक डेडिकेटेड AC वेंट देखील दिलं जाणार आहे. यामुळे कारमध्ये आता थर्ड रो पेसेंजर्सना देखील कूलिंगची सुविधा मिळणार आहे. कारच्या इंटेरिअरला आणखी रॉयल करण्यासाठी यात एम्बीएंट लायटिंग देण्यात आली आहे. 

टोयोटा हायक्रॉस कंपनी २.० लीटर नॅचरल एस्पायर्ड पेट्रोल इंजिनला हायब्रिड तंत्रज्ञानासह सादर करण्याची शक्यता आहे. टोयोटा कंपनीनं या कारचा एक एक्स्टीरिअर लूक देखील समोर आणला आहे. यातून नव्या इनोवाला स्पोर्टी लूक देण्याचा प्रयत्न कंपनीकडून करण्यात आल्याचं दिसून येतं. 

फिचर्स कोणते मिळतील?नुकतंच इनोवा हायक्रॉसच्या इंटेरिअरचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. व्हायरल फोटोंनुसार कारमध्ये मल्टी-लेयर्ड डॅशबोर्ड आणि नव्या डिझाइनसह सेंटर कन्सोल पाहायला मिळणार आहे. कंपनीच्या लेटेस्ट जनरेशन Voxy एमपीवीच्या धर्तीवर नवे बदल केले जाऊ शकतात. याशिवाय मोठा टचस्क्रीन इन्फोटेंमेंट सिस्टम, क्लायमेट कंट्रोल, टच सेन्सिटीव्ह HVAC कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा आणि सेकंड रो कॅप्टन सीट्स इत्यादी फिचर्स पाहायला मिळू शकतात. 

लॉन्च केव्हा अन् किंमत किती?इनोवा हायक्रॉस भारतीय बाजारात २५ नोव्हेंबर रोजी लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. तसंच कंपनी आगामी ऑटो एक्स्पो-२०२३ मध्ये या कारच्या किमतीची घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारची अंदाजित किंमत सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मॉडलपेक्षा थोडी अधिक असू शकते. यासाठी कारच्या लॉन्चिंगची वाट पाहावी लागणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Toyota Innova Crysta ची किंमत १८.०९ लाख रुपयांपासून सुरू होते. तर या कारचं टॉप मॉडलची किंमत २३.८३ लाख रुपये इतकी आहे.

टॅग्स :ToyotaटोयोटाAutomobileवाहन