Toyota Mirai World Record: जपानची वाहन निर्माता कंपनी टोयोटाने पाण्यावर म्हणजेच हायड्रोजनवर चालणारी कार निर्माण केली आहे. महत्वाचे म्हणजे ही कार त्यांनी एकदा हायड्रोजन (Hydrogen) भरला की, 1360 km एवढ्या मोठ्या अंतरासाठी चालविली आहे. या कारचे नाव मिराई (Toyota Mirai) असे ठेवण्यात आले आहे.
हे रेकॉर्ड करण्यासाठी टोयोटाला दोन दिवस लागले. याची Guinness World Records मध्ये नोंद करण्यात आली आहे. केवळ 5 मिनिटांत कारची टाकी फुल झाली आणि ती सील करण्यात आली होती. 1360 किमीचे अंतर कापण्यासाठी 5.65 किलोग्रॅम हायड्रोजन लागला. हायड्रोजन जाळताना पाण्यासह 152 एमपीजी बाहेर पडला. परंतू कार्बन डायऑक्साईडचे शून्य किलो उत्सर्जन झाले. Toyota Mirai ने या काळात एकूण 12 हाय़ड्रोजन स्टेशनांना मागे टाकले. याच जागी जर डिझेलचे वाहन असते तर मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन झाले असते. ही कार हायड्रोजन फ्युअल सेल ईव्ही आहे.
टोयोटा मोटरचे उत्तरी अमेरिकेचे एक्झीक्युटीव्ह व्हाईस प्रेसिडंट बॉब कार्टर यांनी सांगितले की, 2016 मध्ये टोयोटा मिराई पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते. त्याची पुढील पीढी मोठे अंतर कापण्याचे रेकॉर्ड करत आहे.