नवी दिल्ली : टोयोटाच्या नव्या एसयूव्ही टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर (Toyota Urban Cruiser HyRyder) आता लाँच करण्यात आली आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे, मात्र टोयोटाचे लक्ष हायब्रिड कारवर आहे. कंपनीची ही कार हायब्रिड एसयूव्ही देखील आहे, जी जबरदस्त मायलेज देते. या कारमध्ये काय खास आहे, तिची किंमत आणि फीचर्स काय आहेत, यासंदर्भात जाणून घेऊया...
या एसयूव्हीची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये टोयोटाची हायब्रिड कार टेक्नॉलॉजी आहे. अशाप्रकारे ही कार पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर या दोन्हींच्या कॉम्बिनेशनद्वारे चालते. इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देण्यासाठी यामध्ये इलेक्ट्रिक बॅटरी वेगळी चार्ज करावी लागत नाही. उलट ती स्वतःच चार्ज होते. तुम्ही ही कार ड्राइव्ह मोड आणि इलेक्ट्रिक वाहन मोडमध्ये चालवू शकता.
टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडरचा फ्रंट लूक खूपच शानदार आहे. याच्या फ्रंटला क्रिस्टल एक्रीलिक ग्रिल देण्यात आली आहे. मध्यभागी टोयोटा क्रोम फिनिश लोगो आहे, तर एलईडी डीआरएल माध्ये मर्ज होते आणि एक स्टनिंग लुक तयार करते. एसयूव्हीमध्ये हनीकॉम्ब लोअर ग्रिल, क्रोम फिनिश आणि एलईडी आहे. मागील बाजूस, टोयोटाचा सिग्नेचर क्रोम लोगो आणि सी-आकाराचा एलईडी टेल लॅम्प आहे.
या एसयूव्हीमध्ये 1.5-लिटर K-सिरीज इंजिन दिलेले आहे. आपण मारुती ब्रेझामध्ये असेच इंजिन पाहिले आहे, परंतु त्यामध्ये सेल्फ चार्जिंग इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. त्यामुळे, जेव्हा ही कार हायब्रिड मोडवर चालते, तेव्हा ती नेहमीच्या एसयूव्हीपेक्षा 40 टक्के कमी पेट्रोल वापरते. कंपनीचे म्हणणे आहे की, आतापर्यंत हा हायब्रिड टेक्नोलॉजी केवळ Camry सारख्या लक्झरी वाहनांमध्येच होती, पहिल्यांदाच त्यांनी कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये आणली आहे. ही कार आपल्या सेगमेंटमध्ये खूप शक्तिशाली असणार आहे, कारण लोकांना यात 2-व्हीलर आणि 4-व्हीलर ड्राइव्ह मोड्स मिळतील. तसेच, ड्रायव्हर यासाठी ऑटो मोड देखील निवडू शकतो. ही कार 17-इंच अलॉय व्हील्ससह येईल.
याचबरोबर, ही कार मारुतीच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे, त्यामुळे यामध्ये अनेक फीचर्स असे मिळतील की जे मारुती ब्रेझा (Maruti Brezza) आणि मारुती बलेनोमध्ये (Maruti Baleno) पाहण्यात आले आहेत. 360 डिग्री व्ह्यू पार्किंग कॅमेरा, मोठा फ्लोटिंग इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि हेड अप डिस्प्ले मिळेल. तसेच, अॅम्बियन्स मूड लाइटिंग देण्यात आली आहे, परंतु याला प्रीमियम टच देण्यासाठी, त्याच्या केबिनला ड्युअल टोन रंग देण्यात आला आहे. एवढेच नाही तर कारच्या डॅशबोर्डला लेदर फिनिश देण्यात आले आहे. याशिवाय, या कारमध्ये तुम्हाला हवेशीर सीट देखील मिळेल.