सुरक्षित वाहतुकीसाठी, एक जबाबदार नारिक म्हणून आपल्याला वाहतुकीचे नियम माहीत असायलाच हवे. यामुळे आपण तर सुरक्षित राहालच पण रस्त्यांवर वाहतूक करणारे इतर लोकही सुरक्षित राहतील. वाहतूक व्यवस्था सुरक्षित रहावी यासाठी वाहतूक नियमांचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे.
अनेक वेळा नियमांची माहिती नसल्यानेही लोकांकडून कळत न कळत वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. यामुळे आज आम्ही आपल्याला काही बेसिक वाहतूक नियमांसंदर्भात माहिती देत आहोत. याच बरोबर, कोणत्या वाहतूक नियमाचे उलंघन केल्यानंतर, आपल्याला किती दंड भरावा लागेल, यासंदर्भातही आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.
नियमांचे उल्लंघन आणि दंड -- गाडीमध्ये सीट बेल्ट न लावल्यास 1000 रुपये दंड आकारला जातो.- ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय गाडी चालवल्यास 5000 रुपये एवढा दंड आकारला जातो. - ओव्हरस्पिडिंग केल्यास 2000 रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. - ड्रिंक अँड ड्राइव्ह केल्यास 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जातो. एवढेच नाही, तर 6 महिन्यांसी कारावासाची शिक्षाही होऊ शकते.- ड्रिंक अँड ड्राइव्ह करताना दुसऱ्यांद पकडले गेल्यास, 15 हजार रुपयांचा दंड आकारला जातो.- इन्शुरन्स शिवाय गाडी चालवल्यास 5000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला दातो. तसेच, 3 महिन्यांचा कारावासही होऊ शकतो. - अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवल्यास संबंधिताच्या पालकांना 25 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. तसेच 3 वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.- हेल्मेट शिवाय बाईक चालवल्यास 1000 रुपयांचा दंड होऊ शकतो.- आरसी शिवाय वाहन चलवल्यास 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जातो.
हे वाहतुकीचे काही बेसिक नियम आहेत. जे आपल्याला माहीत असायलाच हवेत. नव्हे याचे पालनही व्हायलाच हवे. यामुळे आपले मोठे नुकसान होण्यापासून वाचू शकता.