नवी दिल्ली: देशात नवीन मोटार वाहन कायदा 1 सप्टेंबरपासून लागू झाला आहे. त्यामुळे बेशिस्त वाहन चालविणारे आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी नवीन मोटार वाहन कायद्यात दंडाची रक्कम दहापटीने वाढविण्यात आली आहे. तसेच नवे वाहतुकीचे नियम लागू झाल्यानंतर नवनवीन किस्से समोर येत आहेत. आता तर चक्क वाहतूक पोलिसांनी दंड केल्याने संतापलेल्या एका व्यक्तीने पोलीस ठाण्यातील वीज पुरवठाच खंडीत केल्याची घटना समोर आली आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन प्रकरणी मेरठमधील तेजगढी वाहतूक पोलिसांनी सोम प्रकाश या व्यक्तीवर कारवाई केली होती. सोम प्रकाश यांनी गाडी चालवताना हेल्मेट न घातल्यामुळे तसेच त्यांच्याकडे प्रदूषण प्रमाणपत्र नसल्यामुळे पोलिसांनी चलन फाडले होते. सोम प्रकाश यांनी डोक्याला एलर्जी झाल्यामुळे हेल्मेट न घातल्याचे सांगितले. त्यामुळे तेथील एका उपस्थित पोलिसांनी दंड न आकरण्याचे दूसऱ्या पोलिसांना सांगतिले. मात्र कायद्याची माहिती सांगत सर्वाना कायदा समान असल्याचे सांगितले व चलन फाडण्यात आले. या दरम्यान सोम प्रकाश यांची पोलिसांसोबत थोडा वाद देखील झाला होता.
सोम प्रकाश हे स्थानिक वीज पुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होता. त्यामुळे त्याला संबंधित पोलिस ठाण्याचे वीज बील थकीत असल्याचे समोर आले. त्यानंतर सोम प्रकाश यांनी बदला म्हणून विजेचे बील वेळेत न भरल्यास काय कारवाई होते याची जाणीव करुन देण्यासाठी वीज पुरवठाच खंडीत केल्याचे सांगितले.
नवीन मोटार वाहन कायद्या झाल्यानंतर विविध ठिकाणाहून नवनवीन किस्से समोर येत आहे. याआधी देखील दिल्लीतील एका अल्टो कारच्या मालकाला पोलिसांनी 144 किमीने कार चालविल्याची पावती पाठविली होती. मात्र धक्कादायक म्हणजे या ऑनलाईन पावतीवर फोटो मात्र बलेनो कारचा दिसत होता. यानंतर अल्टो कार मालकाने उत्तर प्रदेश पोलिसांना, तुम्ही चुकीची पावती केली आहे. मी अल्टो चालवतो आणि तुम्ही 144 किमीने जाणाऱ्या बलेनोचा फोटो काढून माझ्या अल्टोच्या नंबरवर 2000 रुपयांचा दंड आकारला आहे असे सांगितले. तसेच 9 वर्षे जुनी अल्टो कार 144 च्या वेगाने पळवून दाखविण्याचे आव्हान अल्टो कारच्या मालकाने पोलिसांना दिले होते.