भारतात इलेक्ट्रीक टू व्हिलरचं क्रेझ वाढत आहे. याकडे पाहता अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रीक टू व्हिलर्स लाँच करत आहेत. याचदरम्यान होंडानं इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करण्याची घोषणा केली आहे. परंतु लोक इलेक्ट्रीक होंडा अॅक्टिवाची वाट पाहत आहेत. कंपनीनं आतापर्यंत याची घोषणा केली नाही. परंतु तुम्ही आपल्या जुन्या अॅक्टिव्हाला मात्र इलेक्ट्रीक अॅक्टिव्हामध्ये बदलू शकता. जर तुमच्याकडे जुनी अॅक्टिव्हा असेल तर १८३३० रुपयांमध्ये तुम्ही तिला इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये बदलू शकता. भारतातील एका खासगी कंपनीनं अॅक्टिव्हासाठी कन्व्हर्जन किट लाँच केलं आहे.
होंडा अॅक्टिव्हा देशातील सर्वात पसंत केली जाणारी स्कूटर आहे. ग्राहक याच्या इलेक्ट्रिक व्हर्जनचीही वाट पाहत आहे. परंतु सध्या ती उपलब्ध नसली तरी थोडा खर्च करून तुम्ही तिला इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये कन्व्हर्ट करू शकता. GoGoA1 या महाराष्ट्रातील कंपनीनं हीरो स्प्लेंडरनंतर आता होंडा अॅक्टिव्हाचं इलेक्ट्रिक कन्व्हर्जन कीट तयार केलं आहे. कंपनीनं तयार केलेल्या स्प्लेंडरच्या कीटलाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाग मिळाला होता.
हे इलेक्ट्रीक कन्व्हर्जन कीट तुमच्या स्कूटरला हायब्रिड आणि पूर्ण इलेक्ट्रीकमध्ये बदलू शकता. या कीटची किंमत १८३३० रुपये असून जीएसटीनंतर ते २३ हजार रुपयांना मिळेल. या इलेक्ट्रीक कीटमध्ये ६० व्होल्ट आणि १२०० वॉटची पॉवर देण्यात आली आहे. यासोबतच यात बीएलडीसी मोटरचा वापर करण्यात आला आहे. हे कीट केवळ अॅक्टिव्हामध्येच वापरता येणाक आहे. तसंच एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर १०० किमीची रेंज देणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.