नवी दिल्ली : टीव्हीएस (TVS) मोटर कंपनीने आपल्या SmartXonnect टेक्नॉलॉजीला अधिक परवडणाऱ्या व्हेरिएंटमध्ये आणत नवीन ज्युपिटर 110 ZX ड्रम (TVS JUpiter 110 ZX) व्हेरिएंट लाँच केली आहे. नवीन TVS JUpiter 110 ZX ड्रम SmartXonnect व्हेरिएंटची किंमत 84,468 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी Jupiter ZX डिस्क व्हेरिएंटपेक्षा 4,520 रुपये स्वस्त आहे. यामध्ये अनेक कनेक्टेड फीचर्स उपलब्ध आहेत.
नवीन TVS Jupiter ZX ड्रम SmartXonnect व्हेरिएंटमध्ये ब्रँडच्या SmartXonnect टेक्नॉलॉजीसह नवीन ब्लूटूथ-सक्षम डिजिटल कन्सोल मिळतो. कंपनीने TVS NTorq सह इतर मॉडेल्सवर हे युनिट आधीच सादर केले आहे. तसेच, SmartXonnect टेक्नॉलॉजी टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, व्हॉइस असिस्ट, कॉल आणि एसएमएस अलर्ट यांसारखी फीचर्स ऑफर करते. या व्यतिरिक्त, या व्हेरिएंटमध्ये स्मार्टफोनसाठी बिल्ट-इन USB चार्जिंग देखील मिळते. नवीन SmartXonnect व्हेरिएंटमध्ये स्टारलाईट ब्लू शेडसह नवीन ऑलिव्ह गोल्ड कलर स्कीम मिळते.
TVS Jupiter 110 ZX चे इंजिनया स्कूटरमध्ये 109.7 सीसी सिंगल-सिलिंडर, फ्यूल इंजेक्शनसह एअर-कूल्ड इंजिन देण्यात आहे आहे. हे पॉवरट्रेन 7,500 आरपीएमवर 7.7 बीएचपी पॉवर आणि 5,500 आरपीएमवर 8.8 एनएमचे पीक टॉर्क विकसित करते, जे CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. ZX ड्रम ब्रेकमध्ये कंबाइंड ब्रेकिंग सिस्टमसह दोन्ही टोकांना 130 मिमी ड्रम ब्रेक मिळतात. स्कूटरला पुढील आणि मागील बाजूस 12-इंच ट्यूबलेस टायर मिळतात.
TVS Jupiter ची किंमत TVS Jupiter रेंज बेस ट्रिमसाठी 73,240 रुपयांपासून सुरू होते आणि Jupiter Classic व्हेरिएंटसाठी 89,648 रुपयांपर्यंत जाते. या सर्व किंमती एक्स-शोरूम, दिल्लीमधील आहेत. TVS Jupiter ही देशात विकली जाणारी सर्वात लोकप्रिय स्कूटर आहे आणि Honda Activa नंतर दुसरी सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. परवडणाऱ्या या व्हेरिएंटमुळे ग्राहक आकर्षित होतील आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी शक्यता आहे.