शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

TVS ची युरोपमध्ये मोठी झेप; रोख पैसे मोजून घेतली स्वित्झर्लंडची सर्वात मोठी E-Bike कंपनी SEMG

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 17:41 IST

TVS कंपनीनं घेतली मोठी झेप. यापूर्वीही काही ब्रँड्सचं केलं होतं अधिग्रहण.

टीव्हीएस मोटर कंपनी (TVS Motor Company) नं गुरुवारी एक मोठी घोषणा केली. कंपनीनं स्विस ई-मोबिलिटी ग्रुप एसईएमजी (Swiss E-Mobility Group) मध्ये ७५ टक्के हिस्सा खरेदी करत त्याचं अधिग्रहण केल्याची माहिती देण्यात आली. या अधिग्रहणाद्वारे कंपनी नॉर्टन मोटरसायकल (Norton Motorcycles) आणि ईजीओ मुव्हमेंटसह (EGO Movement) प्रीमियम आणि टेक्नोलॉजीतील मोठ्या ब्रँडद्वारे युरोपमध्ये विस्ताराच्या विचारात आहे. याकंपन्यांचंही TVS नं नुकतंच अधिग्रहण केलं होतं.

SEMG ही DACH क्षेत्रातील ई-मोबिलिटी सोल्यूशन्स पुरवरणारी आघाडीची कंपनी आहे. कंपनी स्वित्झर्लंडमधील सर्वात मोठी मोठी प्लोअर प्ले ई बाईक (pure-play e-bike) रिटेल चेन M-way चालवते. याचा महसूल जवळपास १०० मिलियन अमेरिकी डॉलर्स इतका आहे. कंपनीकडे एकापेक्षा एक प्रतिष्ठित स्विस मोबिलिटी ब्रान्ड पोर्टफोलिओ आहेत. यामध्ये Cilo, Simpel, Allegro आणि Zenith बाइक्सचा समावेश आहे. 

इलेक्ट्रीक वाहनांत गुंतवणूक“TVS मोटर नेहमीच स्थिरतेसाछी वचनबद्ध आहे आणि १० वर्षांहून अधिक काळ इलेक्ट्रीक वाहनांमध्ये गुंतवणूक करत आहे. पर्यावरण आणि वैयक्तिक जीवनमानावर वाढतं लक्ष नव्या मोबिलिटी सोल्युशन्सची मागणी तेजीनं वाढवत आहे. हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी TVS मोटर गुंतवणूक करत आहे," अशी प्रतिक्रिया कंपनीचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांनी दिली.

रोख व्यवहारई-बाइक युरोपमध्ये पर्सनल मोबिलिटीचं वास्तविक रुप म्हणून समोर येत आहे. कारण वापरण्यास सुलभता, नियामक समर्थन आणि वाहतूक हे एकंदर कल्पनेचे कायमस्वरूपी स्वरूप आहे. ई-सायकलच्या बाजारपेठेत लक्षणीय वाढीची क्षमता आहे, सध्या युरोपमधील सायकल लोकसंख्येच्या सुमारे १५ टक्क्यांपर्यंत पोहोचत आहे आणि १८ टक्क्यांच्या सीएजीआरनं वाढण्यासोबतच ई सायकल बाजारासाठी महत्त्वपूर्ण विकास क्षमता आहे.

टॅग्स :Switzerlandस्वित्झर्लंडIndiaभारतelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर