शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

TVS Radeon देतेय 80 किमीपर्यंत मायलेज, सणासुदीच्या काळात नवीन कलरमध्ये लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 16:58 IST

TVS Radeon Launched In New Colours : कंपनीने लाल आणि काळ्यासह निळ्या आणि काळ्या कलरच्या ड्युअल टोन ऑप्शनमध्ये TVS Radeon बाईक लाँच केली आहे.

दिवसेंदिवस पेट्रोलच्या किंमतीत वाढ होताना दिसून येत आहे. या परिस्थितीत जर तुम्हाला एक लिटर पेट्रोलमध्ये 80 किमीपर्यंत जाण्याची क्षमता असलेली बाईक मिळाली आणि तिची किंमत देखील कमी असेल तर नक्कीच ही एक दिलासादायक बाब होईल. दुचाकी कंपनी TVS Motor ने दावा केला आहे की, कंपनीची TVS Radeon बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 80 किमीपर्यंतचे मायलेज देते. आता कंपनीने या सणासुदीत दोन नवीन ड्युअल टोन कलरमध्ये ही बाईक लॉन्च केली आहे. (TVS Radeon launched in new colours for festive season)

TVS Radeon ला नवीन कलरकंपनीने लाल आणि काळ्यासह निळ्या आणि काळ्या कलरच्या ड्युअल टोन ऑप्शनमध्ये TVS Radeon बाईक लाँच केली आहे. याशिवाय बाईकमध्ये अजून कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. हे दोन्ही नवीन ड्युअल टोन कलर बाईकच्या इंधन टाकीवर दिसतील. याशिवाय, त्याचा हेडलॅम्प केवळ बॉडी कलरचा असेल. बाईकच्या साइड पॅनलवर ड्युअल टोन टच देखील असेल. दुसरीकडे, इंजिनवरील गोल्डन टच आणि अलॉय व्हील्स देखील काळ्या कलरच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध असतील.

TVS Radeon मध्ये दमदार इंजिन TVS Radeon ही 110cc सेगमेंट बाईक आहे. यात BS-6 अनुरूप 109.7cc सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन आहे. हे 8.08 PS पॉवर आणि 8.7 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. यात 4-स्पीड गिअरबॉक्स आहे.

TVS Radeon बाईकचे मायलेजTVS Motor चा दावा आहे की,  कंपनीची TVS Radeon ही कमी किमतीची बाईक आहे आणि जास्त मायलेज देते. कंपनीचे म्हणणे आहे की, ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 79.3 किमी मायलेज देते. दिल्लीमध्ये ड्युअल टोन ड्रम व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत जवळपास 69,000 रुपयांपासून सुरू होते आणि डिस्क व्हेरिएंटची किंमत सुमारे 72,000 रुपये आहे.

टॅग्स :Automobileवाहन