नवी दिल्ली : सध्या भारतीय ऑटो क्षेत्रात इलेट्रिक वाहनांची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. यातच इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलायचे झाल्यास, अगदी कमी किमतीत Ujaas eZy ई स्कूटर आहे. तसेच, यामध्ये चांगले फीचर्स देखील कंपनीकडून देण्यात आले आहे. जर तुम्हाला या स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल देखील जाणून घ्यायचे असेल तर आम्ही येथे या स्कूटरची किंमत, फीचर्स, रेंज, बॅटरी, ब्रेकिंग सिस्टम आणि स्पेसिफिकेशनची माहिती देत आहोत.
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने याची सुरुवातीची किंमत 31,880 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) सह बाजारात लाँच केली आहे. ऑन रोड या स्कूटरची किंमत 34,863 रुपये आहे. तसेच, कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 48V, 26Ah क्षमतेचा लीड अॅसिड बॅटरी पॅक दिला आहे. या बॅटरी पॅकसोबत 250W पॉवर हब मोटर जोडलेली आहे. बॅटरी पॅकच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी सामान्य चार्जरने चार्ज केल्यानंतर 6 ते 7 तासांत पूर्ण चार्ज होते.
या इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजसाठी कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 60 किमीची रेंज देते. या रेंजसह 25 किमी प्रतितासचा टॉप स्पीड मिळतो. तसेच, ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने आपल्या दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक्सचे कॉम्बिनेशन दिले आहे, ज्यामध्ये अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर दिले आहेत. सस्पेन्शन सिस्टीममध्ये कंपनीने स्कूटरच्या पुढच्या भागात टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागील बाजूस हायड्रोलिक सस्पेंशन सिस्टीम बसवली आहे.
Ujaas eZy स्कूटरमधील फीचर्सफीचर्समध्ये कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये चार्जिंग पॉइंट, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ओडोमीटर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, अँटी थेफ्ट अलार्म सिस्टम, कीलेस राइडिंग, रिव्हर्स ड्रायव्हिंग गियर, पास स्विच, एलईडी डिस्प्ले, एलईडी हेडलाइट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प, एलईडी टेल लाइट, लो बॅटरी इंडिकेटर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.