बंगळुरूची स्टार्टअप कंपनी Ultraviolette ने गुरुवारी देशातील पहिली इलेक्ट्रीक स्पोर्टी बाईक F77 लाँच केली आहे. जागतीक स्तरावर या बाईकला ७७ हजार हून अधिक बुकिंग मिळाल्या आहेत. ही हाई परफॉर्मेंस इलेक्ट्रिक मोटरसायकल जानेवारी २०२३ पासून डिलिव्हर केली जाणार आहे.
Ultraviolette F77 मोटरसायकल भारतीय बाजारात 3.8 लाख रुपयांपासून सुरु आहे. अल्ट्राव्हायोलेटने F77 ला Airstrike, Shadow आणि Laser या तीन प्रकारांमध्ये सादर केले आहे. ग्लाइड, कॉम्बॅट आणि बॅलिस्टिक असे तीन रायडिंग मोड आहेत. F77 भारतात अल्ट्राव्हायोलेटच्या बेंगळुरू येथील संशोधन केंद्रात विकसित करण्यात आले आहे. या बाईकला ग्लोबल सर्टिफिकेटही मिळाले आहे.
सुरुवातीला बंगळुरुमध्ये ही बाईक डिलिव्हर केली जाईल, त्यानंतर ती देशभरात वितरीत केला जाणार आहे. अल्ट्राव्हायोलेट F77 हे डिस्प्ले आणि अॅपद्वारे नियंत्रित करता येते. मेन्टेनन्स, राइड अॅनालिटिक्स, सेवा, अँटी- थेप्ट आणि रिअल-टाइम डेटा इंटरप्रिटेशन यासारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. 1,00,000 किमी या 8 वर्षे अशी वॉरंटी देण्यात आली आहे.
या बाईकचा सर्वाधिक वेग 147 किमी प्रतितास आहे. 0 ते 100 किमीचा वेग ८ सेकंदांत पकडते. अल्ट्राव्हायोलेट F77 इलेक्ट्रिक मोटरसायकलला 10.3kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो जो 38.9 bhp आणि 95 Nm टॉर्क जनरेट करतो.
किंमत...अल्ट्राव्हायोलेट F77 - रु. 3,80,000अल्ट्राव्हायोलेट F77 रेकॉन - 4,55,000 रुअल्ट्राव्हायोलेट F77 लिमिटेड - रु 5,50,000