शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

सिंगल राइडमध्ये 6,727Km चा प्रवास! 'या' इलेक्ट्रिक बाईकने रचला इतिहास...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 8:22 PM

22 दिवसांमध्ये 14 राज्ये अन् 27 हजार रुपयांची पेट्रोल बचत. आशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद.

Ultraviolette F77: बंगळुरुमधील इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्टअप अल्ट्राव्हायोलेटने (Ultraviolette) अलीकडेच आपली नवीन मोटरसायकल 'F77' बाजारात लॉन्च केली आहे. आता या इलेक्ट्रिक बाईकने एक मोठा विक्रम केला आहे. सिंगल राइडमध्ये बाईखने तब्बल 6,727 किलोमीटरचा प्रवास करुन इतिहास रचला आहे. कंपनीने सांगितले की, या कामगिरीसाठी अल्ट्राव्हायोलेट F77 चे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

14 राज्ये अन् आणि -15°C मध्ये बाईक धावलीकंपनीने सांगितले की, या रोमांचक प्रवासाचे नेतृत्व बाला मणिकंदन यांनी केले होते. ते चेन्नईतील अल्ट्राव्हायोलेट F77 च्या पहिल्या ग्राहकांपैकी एक आहेत. हा प्रवास 21 मे 2023 रोजी चेन्नई येथून सुरू झाला. खराब हवामान...कठीण प्रदेशातून जात ही बाईक 14 राज्यांमधून गेली. अखेर 12 जून 2023 रोजी हा प्रवास बेंगळुरुमध्ये संपला. यादरम्यान, बाईक 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि उणे -15 अंश सेल्सिअस तापमानात धावली. या राइड दरम्यान बाइकवर 55 किलोचा अतिरिक्त भार देखील होता, ज्यामध्ये प्रवासादरम्यान वापरल्या जाणार्‍या आवश्यक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.

27,000 रुपयांच्या पेट्रोलची बचतअल्ट्राव्हायोलेटने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, या प्रवासादरम्यान F77 मोटरसायकलने सुमारे 270 लिटर पेट्रोलची बचत केली. देशातील बहुतांश भागात सध्या पेट्रोल 96 ते 100 रुपये प्रतिलिटर आहे. किमान किंमत देखील जोडली तर बाइकने पेट्रोलवरील जवळपास (270x96 = 25920) 26 हजार रुपये वाचले आहेत. यादरम्यान बाइकने 645 किलो कार्बन उत्सर्जनही रोखले.

कशी आहे अल्ट्राव्हायोलेट F77 F77 चे ओरिजनल आणि रेकॉन, दोन्ही व्हर्जन 38.8 bhp पॉवर आणि 95 Nm टॉर्क जनरेट करते. याचा टॉप स्पीड 147 किमी प्रतितास असून, बाईकमध्ये तीन रायडिंग मोड्स दिले आहेत. यात ग्लाइड, कॉम्बॅट आणि ब्लास्टिक मोड मिळतील. ही बाईक दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह येते, ज्यात 7.1 kWh आणि 10.3 kWh चा समावेश आहे. या बॅटरी अनुक्रमे 206 किमी आणि 307 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज (IDC) देतात.

कंपनीने या बाइकला फ्युचरिस्टिक डिझाइन दिले आहे. बाइकमध्ये मोनोशॉक आणि इनव्हर्टेड फोर्क सेटअप, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आहेत. एलईडी हेडलाइट्स, टेललॅम्प्स आणि डे टाईम रनिंग लाइट्स (DRL's) बाईकला अजून आकर्षक बनवतात. यात स्मार्ट टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये बाइकचा वेग, बॅटरीची स्थिती यासंबंधी माहिती उपलब्ध आहे. कंपनी दोन्ही बॅटरीवर 8 वर्षांपर्यंत किंवा 1 लाख किलोमीटरपर्यंतची वॉरंटी देत ​​आहे. या बाईकची किंमत 3.8 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहनbikeबाईक