नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाहनासंबंधी एक नवा नियम जारी केल्याचे सांगितले जात आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास तब्बल १ लाख रुपये दंडाची तरतूद केली असून, १ वर्षाचा तुरुंगवासही होऊ शकतो, असे म्हटले आहे. कार बनवणाऱ्या कंपनीने आयात शुल्क किंवा डीलर वाहनांच्या निर्माणात कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ही कारवाई केली जाऊ शकते.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कार बनवणाऱ्या कंपनीने आयात शुल्क किंवा डीलर वाहनांच्या निर्माणात कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाऊ शकते. नवीन नियमांचे उल्लंघन केल्यास १ लाख रुपयाचा दंड आणि १ वर्षाची जेल होऊ शकते. हा दंड प्रति वाहन १ लाख रुपयांपर्यंत दंड बसू शकतो. या नियमांचे उल्लंघ केल्यास आधी १ हजार रुपये आणि ५ हजार रुपये दंड होता. परंतु, आता नवीन नियमांनुसार, १ लाख रुपयांपर्यंत दंड बसू शकतो.
हेलमेट आणि हार्नेस बेल्टचा वापर करणे बंधनकारक
अलीकडेच, रस्ते वाहतूक मंत्रालयाने दुचाकीस्वारांसाठी नवीन नियम आणला आहे. यात ४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना बसण्यावरून अधिसूचित करण्यात आले आहे. या नियमांनुसार चालकांसह मुलांना हेलमेट आणि हार्नेस बेल्टचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच स्कूटर किंवा बाइक चालवताना याचा वेग फक्त ४० किमी प्रति तास इतका असायला हवा. नवीन नियमांचे उल्लंघन केल्यास १ हजार रुपयांचा दंड आणि तीन महिने पर्यंत ड्रायविंग लायसन्स रद्द केले जाऊ शकते. नवीन नियमांनुसार, वापरले जाणारे सेफ्टी हार्नेस हलके, वॉटरप्रूफ, कुशनचे असायला हवे. यात ३० किलोग्रॅम वजन वाहून नेण्याची क्षमता असायली हवी. प्रवासादरम्यान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी हार्नेस बांधणे गरजेचे आहे. जे दोन पट्ट्यांसोबत येते.