शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

Renault Kwid पेक्षा मोठी कॉम्पॅक्ट एसयुव्ही सादर; जाणून घ्या फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 4:40 PM

Renault India Kiger: रेनो ही फ्रान्सची कार निर्माता कंपनी आहे. ही कार नोव्हेंबर 2020मध्ये पहिल्यांदा लाँच झाली होती.

देशात सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटला जबरदस्त पसंती मिळू लागली आहे. नुकतीच लाँच झालेली निस्सानची मॅग्नाईट, ह्युंदाई व्हेन्य़ू, किया सोनेट हे ताजे उदाहरण आहे. आता आणखी एक नवीन कॉम्पॅक्ट एसयुव्ही भारतीय रस्त्यांवर धावण्यास सज्ज झाली आहे. होय, रेनो इंडियाने (Renault India) कायगर (Kiger) सादर केली आहे. 

रेनो ही फ्रान्सची कार निर्माता कंपनी आहे. ही कार नोव्हेंबर 2020मध्ये पहिल्यांदा लाँच झाली होती. ही नवीन कायगर कार पहिल्या तिमाहीत भारतात लाँच होईल. डस्टर, क्विड आणि ट्रायबरच्या यशानंतर रेनोने नवीन श्रेणीमध्ये पाऊल ठेवले आहे. अंतर्गत भागात स्मार्ट केबिन देण्यात आली आहे. टर्बोचार्ज 1.0 लिटर पेट्रोल इंजिन, मल्टी सेन्स ड्राईव्ह मोड्स देण्यात आले आहेत. सिग्नेचर फ्रंट मेन ग्रिलची स्टाईल पाहून असे वाटते की, ही कार लोकप्रिय क्विडवरून बनविण्यात आली आहे. 

कारच्या फ्रँट बंपरमध्ये आडवे स्टैक्ड हेडलँप्स आणि स्लीक एलईडी डीआरएल देण्यात आले आहेत. कारमध्ये ड्युअल टोन इफेक्टचा टप देण्यात आला आहे. पाठीमागे सी-शेप एलईडी टेल लँप देण्यात आले आहेत. Renault Kiger मध्ये दोन इंजिन ऑप्शन देण्यात आले आहेत. पहिले 1.0-लीटर पेट्रोल आणि दुसरे 1.0-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. सीवीटी ऑप्शनदेखील देण्यात आला आहे. मात्र दोन्ही इंजिनप्रकारांना अनुक्रमे EASY-R AMT आणि X-TRONIC CVT गिअरबॉक्स देण्यात येणार आहे. मल्टीसेंस ड्राइव्ह मोडमध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट मोड देण्यात आले आहेत. 

Kiger एसयूव्ही Renault च्या मॉड्यूलर CMF-A+ प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे. या कारची साईज निस्सानच्या मॅग्नाईटसारखीच असणार आहे. मॅग्नाईटची लांबी 3994 mm, रुंदी  1758 mm आणि उंची 1572 mm आहे. या सेगमेंटमध्ये सर्वाधिक 205 mm चा ग्राऊंड क्लिअरन्स मिळतो. Renault Triber ही सात सीटर कार सर्वात स्वस्त कार म्हटले जात होते. मात्र, Nissan Magnite ने हा किताब काढून घेतला आहे. Renault  Kiger ही ती कॉम्पॅक्ट एसयुव्ही असणार आहे. ही कार भारतातील सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट एसयुव्ही असण्याची शक्यता आहे. कारण या कारचीही किंमत 5 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. ही कार या सेगमेंटमधील सर्वात छोटी असली तरीही मायक्रो किंवा मिनी एसयुव्ही म्हटले जाणार नाही. कारण या कारची साईज ४ मीटरपेक्षा छोटी असणार नाही.

रेनॉ कायगरचा मुकाबला मारुती ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू, टाटा नेक्सॉन, महिंद्रा XUV300 आणि किया सोनेटशी असणार आहे. Kiger मध्ये स्प्लिट LED headlamps आणि LED DRLs आहेत. Kiger मध्ये नवीन डॅशबोर्ड देण्यात येणार आहे. तसेच सनरुफही असण्याची शक्यता आहे. या कारची किंमत 5 ते 9.50 लाख एक्सशोरुम असण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Renaultरेनॉल्टAutomobileवाहन