इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी असलेल्या जीटी- फोर्सने जीटी ड्राईव्ह, जीटी ड्राईव्ह प्रो आणि इलेक्ट्रिक मोटरसायकल प्रोटोटाईप ह्या तीन इलेक्ट्रिक दुचाकींचे अनावरण केले. जीटी ड्राईव्ह सिंगल चार्जवर 150 किमीचे अंतर कापते.
जीटी ड्राईव्ह - जीटी फोर्सची ईव्ही स्कूटर 60 किमी प्रति तास ही सर्वोच्च गती मिळते व एका चार्जवर 150 किमी इतके अंतर पार करता येते. तीन ड्राईव्ह मोडस मिळतात- इकोनॉमी, स्टँडर्ड आणि टर्बो. स्कूटरमध्ये क्रूझ नियंत्रण प्रणालीसुद्धा उपलब्ध केलेली आहे.
जीटी ड्राईव्ह प्रो- कमी गतीच्या प्रकारातील ही ई- स्कूटर छोट्या अंतरावर प्रवासासाठी सेवा देण्यासाठी बनवण्यात आली आहे. कुटुंब, महिला व मुलांच्या गरजा लक्षात घेऊन ह्या स्कूटरमध्ये सर्वांसाठी सुविधा देण्यात आली आहे. एका चार्जवर ती सहजपणे 75 किमी इतके अंतर पार करू शकते आणि 25 किमी प्रति तास ही तिची सर्वोच्च गती आहे. ही स्कूटर लीड एसिड आणि लिथिअम आयन बॅटरी या दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे.
जीटी- फोर्सचे सह- संस्थापक आणि सीईओ मुकेश तनेजा यांनी म्हटले, “लोकांचा असा गैरसमज असतो की, ईव्हीज दूर अंतराच्या गरजांची पूर्तता करू शकत नाहीत. त्या पुरेशा सुविधा देऊ शकत नहीत. याचे कारण इतकेच आहे की, त्यांनी आजवर या उत्पादनांचा अनुभव घेतलेला नाही. ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी आमची टीम नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.” 2022 वर्षाच्या दुस-या तिमाहीत ही मोटर बाईक बाजारपेठेमध्ये येणार आहे. जीटी- फोर्सने आपल्या वितरकांचे नेटवर्क देशामध्ये 80 शहरांमध्ये व 100 पेक्षा जास्त वितरकांसह वाढवले आहे. सध्या तिची महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाना, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानामध्ये डीलरशीप आहेत.