नवी दिल्ली : सध्या देशात SUV आणि MPV कारना प्रचंड मागणी आहे, त्यामुळे या सेगमेंटमध्ये जास्तीत जास्त मॉडेल्स लाँच केले जातात. या क्रमाने येत्या काही महिन्यांत अनेक नवीन कार लवकरच बाजारात दाखल होणार आहेत. यामध्ये महिंद्रा, टोयोटा आणि एमजीसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. जर तुम्ही नवीन SUV कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही काही येत्या काळात लाँच होणाऱ्या कारचाही विचार करू शकता. या कारची संपूर्ण यादी पहा.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस (Toyota Innova Hycross) टोयोटा मोटर्स लवकरच आपल्या नवीन MPV कार इनोव्हा हायक्रॉस देशात लाँच करू शकते. कंपनीने या नवीन कारचा सिल्हूट लुक सादर केला आहे. टोयोटा कंपनी ही नवीन MPV त्यांच्या जागतिक TNGA-C प्लॅटफॉर्मवर तयार करणार आहे.
फोर्स गुरखा 5 डोअर (Force Gurkha 5 Door)फोर्स मोटर्स लवकरच आपल्या 3 Door मॉडेलच्या गुरखाचे 5 Door व्हर्जन देशात आणू शकते. या कारची डिझाइन सध्याच्या SUV सारखीच असण्याची अपेक्षा आहे. या कारला 2.6-लिटर कॉमन रेल टर्बो इंजिन मिळेल, जे 90 bhp पॉवर आणि 250 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. यासोबतच या कारमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्सही मिळणार आहे.
महिंद्रा बोलेरो निओ प्लस (Mahindra Bolero Neo Plus)महिंद्रा अँड महिंद्रा लवकरच त्यांची नवीन बोलेरो निओ प्लस एसयूव्ही 7 आणि 9 सीटर व्हर्जनमध्ये लॉन्च करू शकते. कार सध्याच्या 2.2L mHawk डिझेल इंजिनद्वारे चालविली जाईल, जी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्ससह ऑफर केली जाईल. यासोबतच अनेक फीचर्स अपडेट्स मिळण्याची अपेक्षा आहे.
सिट्रोएन सी 3 एमपीवी (Citroen C3-7-seater MPV)Citroën मधील ही नवीन MPV देशात चाचणी दरम्यान अनेक वेळा पाहिली गेली आहे. नवीन 7-सीटर MPV ला 16-इंच अलॉय व्हील मिळतील, ज्यामुळे अधिक ग्राउंड क्लिअरन्स मिळण्याची अपेक्षा आहे. या कारचा लुक आणि इंटीरियर सध्याच्या Citroën C3 प्रमाणे असेल.