नवे वर्ष ऑटोमोबाईल सेक्टरसाठी खूप आशावादी आणि धमाकेदार राहणार आहे. या वर्षात एकसो एक हॅचबॅक, एसयुव्ही लांच होणार आहेत. यापैकी काही कार या अपडेटेड व्हर्जन असणार आहेत.
या कारमध्ये मिड लाईफ अपडेट आणि फेसलिफ्ट अपडेट असेल. जर तुम्ही कार खरेदी करण्याचा मूड बनवत असाल तर थोडे थांबा, कारण जुनी आऊटडेटेड कार तेवढ्याच किंमतीला घेण्यापेक्षा, नवीन अद्ययावत कारचे मालक होणे तुम्हाला नक्कीच आवडेल.
नवीन कार घेतली की तीन-चार वर्षांत तिच्यावरून मन उडू लागते. कारण या काळात अनेक चांगली चांगली मॉडेल अन्य कंपन्यांनी बाजारात आणलेल्या असतात. मग तुमची कार डाऊन मार्केट ठरू लागते. यामुळे कर्ज जास्त अवधीचे नसले तर ठीक, असले तर मन मारावे लागते. यामुळे तुम्हीच विचार करा. तसाही वेटिंग पिरिएड हा आता तीन, सहा महिन्यांपेक्षा जास्त गेला आहे.
जाणून घ्या यंदा येणाऱ्या कारची लिस्ट....
- मारुतीच्या कार - मारुती बलेनो, मारुती अर्टिगा, XL6, सियाझ, एस-क्रॉस, वॅगन आर
- ह्युंदाईच्या कार - ह्युंदाई व्हेन्यू, क्रेटा, कोना ईव्ही
- महिंद्राच्या कार - महिंद्रा बोलेरो, महिंद्रा एक्सयूवी 300
- टोयोटाच्या कार - टोयोटा ग्लैंजा, टोयोटा अर्बन क्रूजर
- कियाच्या कार - किआ सेल्टॉस
- एमजी- झेडएस ईव्ही