जीप इंडियाने आपल्या सर्व कारमध्ये बीएस6 फेज2 साठी अपग्रेड केल्या आहेत. याचबरोबर ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी ‘जीप वेव एक्सक्लूझिव्ह’ नावाने नवा ओनरशिप प्रोग्रॅम लाँच केला आहे. या प्रोग्रॅमनुसार तीन वर्षांची वॉरंटी, ९० मिनिटांत सर्व्हिस पॅकेज सुरु करणे आणि जीप कोर्टसी एज, जीप जीनियस व जीप एडवेंचर कंसर्ज सारखे प्रोग्रॅम आहेत.
पॅकेजमध्ये काय काय...तीन वर्षांची वॉरंटी: तोडफोड आणि झिजलेले पार्ट वगळता सर्व भाग कव्हर करते.सेवा पॅकेज: ग्राहकांना पिकअप अँड ड्रॉप सेवाही दिली जाणार आहे. तसेच ९० मिनिटांत सर्व्हिसिंगही केले जाणार आहे.जीप सौजन्य एज: जर तुमची जीप एसयूव्ही 4 दिवसांपेक्षा जास्त काळ दुरुस्त करायची असेल, तर कंपनी तुम्हाला तुमच्या वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वाहन देईल.जीप जिनियस: ऑनलाइन सेवेद्वारे ग्राहकांना त्यांच्या वाहन आणि कंपनीशी संबंधित अधिक माहिती मिळू शकेल.Jeep Adventure Concierge: ऑफ-रोड ट्रिपची योजना करण्यात मदत करेल.
जीप एसयूव्ही विकत घेतलेले किंवा भाड्याने घेतलेले सर्व विद्यमान ग्राहक या नवीन प्रोग्रॅमसाठी पात्र आहेत. परंतू 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर खरेदी केलेल्या जीप कारलाच तीन वर्षांची वॉरंटी मिळेल. जीपकडे सध्या भारतात चार एसयूव्ही आहेत, ज्यात कंपास (ट्रेलहॉक प्रकारासह), मेरिडियन, रँग्लर आणि ग्रँड चेरोकी यांचा समावेश आहे. जीप कारची किंमत 21.09 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 78.50 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) पर्यंत जाते.