दिल्लीमध्ये नवीन इलेक्ट्रीक वाहनांची पॉलिसी जारी करण्यात आली आहे. तिथे मोठमोठी सूट देण्यात येत आहे. असे असले तरी देशभरातही इलेक्ट्रीक स्कूटर, कार हळूहळू का होईना लोक घेत आहेत. दिल्लीच्या मंत्र्यांनी स्विच दिल्ली मोहिम सुरु केली आहे. या अभियानाद्वारे त्यांनी इलेक्ट्रीक स्कूटर घेतल्यास पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत वर्षाला 22000 रुपये वाचविता येणार असल्याचा दावा केला आहे.
TVS iQube इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; जाणून घ्या किंमत आणि रेंज...महत्वाचे म्हणजे हे पैसे काही रजिस्ट्रेशनवर नाही तर तुमच्या दररोजच्या वापरावर वाचणार आहेत. दिल्लीचे परिवाहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. पेट्रोल स्कूटर किंवा पेट्रोल बाईक वापरायची सोडून इलेक्ट्रीक स्कूटर वापरण्यास सुरुवात केली तर लोक मोठी सेव्हिंग करू शकणार आहेत. इलेक्ट्रीक स्कूटरचा वापर केल्यास पेट्रोल स्कूटरवाल्यांचे वर्षाला 22000 रुपये आणि पेट्रोल बाईक वापरणाऱ्यांचे 20000 रुपये वाचणार आहेत.
दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले की, फक्त पैसेच नाहीत तर पर्यावरणाला देखील फायदा होणार आहे. एका इलेक्ट्रीक स्कूटर तुमच्या पेट्रोल दुचाकीच्या बदल्यात 1.98 टन कार्बन उत्सर्जन वाचविणार आहे. हे 11 वृक्षांच्या लागवडीएवढे आहे.
दिल्लीमध्ये हा आठवडा इलेक्ट्रीक बाईक आणि ई स्कूटर वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी स्विच दिल्ली मोहिम राबविण्यात येत आहे. यानुसार इलेक्ट्रीक दुचाकी खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. याद्वारे सरकारकडून करात सूट दिली जाणार आहे. असेच प्रयत्न महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी केल्यास त्याचा फायदा लोकांना आणि पर्यायाने प्रदूषणालाही होणार आहे.
इलेक्ट्रीक वाहन घेण्याचे फायदेच अधिक; तोटे फक्त २...जाणून घ्या...
दुचाकीमध्ये आणि खासकरून स्कूटर सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या टीव्हीएस (TVS Motor Company) ने iQube इलेक्ट्रीक स्कूटर दिल्लीमध्ये लाँच केली. सुरुवातीला ही स्कूटर काही मोजक्याच डिलरकडे मिळणार आहे. टीव्हीएसने या स्कूटरला 3 वर्षे किंवा 50000 किमींची वॉरंटी दिली आहे. कंपनी ही स्कूटर लवकरच देशातील अन्य शहरांतही उपलब्ध करणार आहे. भारतीय बाजारात टीव्हीएसच्या या स्कूटरची स्पर्धा Bajaj Chetak आणि Ather च्या इलेक्ट्रीक स्कूटरसोबत होणार आहे.
E-Scooter Mileage TIPS: इलेक्ट्रीक स्कूटरची रेंज कशी वाढवाल? ही काळजी घ्या...
कमी खर्चात जास्त अंतर कापण्यासाठी या स्कूटर उपयोगी ठरू लागल्या आहेत. अनेकजण असे आहेत ज्यांच्याकडे इलेक्ट्रीक स्कूटर आहे परंतू कंपनीने केलेल्या दाव्यानुसार रेंज देत नाही. यामुळे ही स्कूटर रेंजच्या निम्म्याहून अधिक अंतर कापल्यावर बंद पडते. जर ही स्कूटरची बॅटरी लवकर संपत असेल तर त्यात काही तांत्रिक बिघाड असतोच असे नाही.तुम्ही काही टिप्स फॉलो करून स्कूटरची रेंज 10 ते 20 टक्के वाढवू शकता.