कार, बस, ट्रक यासारख्या वाहनांचा वायपर हा फक्त पावसाळ्यात वापरायचा असतो, अशी अनेकाची समजूत आहे. चालकासमोरच्या विंड शील्ड अर्थात समोरची काचेवर पडणारे पाणी पुसण्यासाठी वायपर असतो, किंवा पावसाळ्यात सतत पाणी पडत असताना ड्रायव्हरला समोरचे दृश्य कार चालवताना नीट दिसावे, म्हणून वायपर असतो, इतकीच एक समजूत काहींनी करून घेतलेली असते. मुळात वायपरचा वापर हा केवळ त्यासाठी नसतो. पावसाळ्यातच नव्हे तर अन्य ऋतुंमध्येही वायपर वापरायला हवा. अनेक बाबी अशा असतात की त्या वापरल्या नाहीत तर त्या खराब होतात व ऐनवेळी त्या कामाला येत नाहीत. वायपरचेही तसेच आहे. यासाठीच वायपर नियमितपणे वापरणे गरजेचे आहे. तो जर वापरला गेला नाही, तर वायपर यंत्रणा कुचकामीही होऊ शकते. तसेच आपण वापरीत असलेला वायपर योग्य काम करीत आहे की नाही, त्याची क्षमता किती आहे, हे कळायलाही सोपे जाते. दुसरी बाब म्हमजे वायपर यंत्रणेमध्ये काचेवर रबराचा जो भाग पाणी पुसून टाकण्यासाठी फिरत असतो, त्या वायपर ब्लेडला एक विशिष्ट आयुष्यमर्यादा असते. यामुळे त्याचे आयुष्य जे काही आहे ते उपयोगात आणावे. आपले आयुष्य कामी लागावे, त्यात काही अडचण येऊ नये, असे वायपरलाही मन असते तर वाटले असते. वायपरमध्ये काचेवर पाणी पुसणारे वा वाईप करणारे रबरी ब्लेड असते. त्याला सिलिकॉनचे कोटिंग असते. ते ज्या लोखंडी पट्टीला बसवण्यात येते त्याला हलवणारी इलेक्ट्रिक यंत्रणा तुमच्या कारला वा वाहनाला दिलेली असते, जी बॅटरीवर चालते. का सुरू झाली की ती यंत्रणा सुरू होते. म्हणजे जे इग्निशन दिली की ती यंत्रणा सुरू होते. सर्वसाधारणपणे स्टिअिरंग व्हीलच्या डाव्या बाजूला वायपरची नियंत्रण कळ असते. त्यानुसार वायपरची गती कमी अधिक करणे, वाईप करण्याचा काळ आवश्यक तसा ठेवणे आणि बंद करणे ही कृती या बटणाद्वारे करता येते.
वायपर नियमित वापरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 7:39 PM