आज पेट्रोलशिवाय एक फूटही बाईक पुढे जात नाही. तर नुकतीच मायक्रोमॅक्स मोबाईलच्या मालकाने देशातील पहिलीच इलेक्ट्रीक बाईक लाँच केल्याची चर्चा आहे. सीएऩजीवर चालणारी अॅक्टिव्हा येणार असे तर आपण गेली काही वर्षे ऐकतच आलोय. मात्र, एका तरुणाने त्याच्या बाईकवर वेगळाच प्रयोग केला आहे. त्याने पेट्रोल ऐवजी चक्क कोकाकोला बाईकच्या टाकीत ओतले. पण पुढे काय झाले? चला पाहुया.
भारतात सध्या ऑटोमोबाईल क्षेत्र क्रांतीच्या काळातून जात आहे. पुढील काही वर्षांत लहान वाहनांना इलेक्ट्रीकमध्ये परिवर्तीत करावे लागणार आहे. अशातच केवळ स्टार्टअप सोडून अन्य बाईकच्या दिग्गज कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. मायक्रोमॅक्सने नुकतीच इलेक्ट्रीक बाईक लाँच केली आहे. रिव्होल्ट असे या बाईकचे नाव आहे. तर याआधी काही स्टार्टअप कंपन्यांनी इलेक्ट्रीक स्कूटरही लाँच केल्या आहेत.
मात्र, एका तरुणाने युट्युबवर व्हिडिओ टाकला असून त्याने चक्क बाईकमध्ये कोका कोला ओतले आहे. आता ही बाईक पुढे गेली की बंद पडली याबाबत सांगणे कठीण आहे. हा व्हिडिओ YASH KE EXPERIMENTS द्वारे युट्युबवर आहे. या व्हिडिओमध्ये Hero Honda Glamour या जुन्या बाईकमधील पेट्रोल पूर्ण काढताना दिसत आहे. यानंतर 2 लीटरची कोका कोलाची बाटली टाकीमध्ये ओतली आहे. यानंतर जे या व्हिडिओमध्ये दिसले ते आश्चर्यचकित करणारे आहे. यामागचे कारण शोधले असता असा तर्क निघतो की, या सॉफ्ट ड्रिंकमध्ये ऑक्सीजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन असल्याची शक्यता आहे. हे पदार्थ बाईकला ताकद प्रदान करण्यास समर्थ असण्याची शक्यता आहे.
कोका कोला टाकल्यानंतर बाईक लगेचच सुरू झाली आणि चालायलाही लागली. मात्र, बाईकने नेहमीपेक्षा जास्त धूर सोडण्यास सुरुवात केली. मात्र, याबाबत काही मॅकॅनिक आणि इंजिनिअरनी सांगितले की कोणतीही बाईक कोका कोला सारख्या पेय पदार्थांवर चालू शकत नसल्याचे सांगितले. जर असे झाले असते तर पेट्रोल पंप राफाईंड जीवाश्म फॉसिल फ्युअल ऐवजी पेय पदार्थच विकत असते. जर तुम्ही अशा प्रकारचा प्रयोग करण्याचा विचार करत असाल तर तुमची बाईक बिघडू शकते.