शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

चिप तुटवड्यामुळे वाहन विक्रीला लागला ब्रेक; किमतीमध्ये झालेल्या वाढीचाही अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 6:11 AM

ऑक्टोबरमध्ये बहुतांश कंपन्यांना फटका काही महिन्यांपासून सेमिकंडक्टर चिपचा तुटवडा आहे. त्यामुळे वाहनांच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली हाेती.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सेमिकंडक्टर चिपच्या तुटवड्याचा परिणाम वाहनविक्रीवर झाला आहे. चारचाकी तसेच दुचाकी वाहनांच्या विक्रीला ब्रेक लागला आहे.  ऑक्टाेबरमध्ये सर्वच कंपन्यांची वाहनविक्री कमी झाली आहे. काही महिन्यांपासून सेमिकंडक्टर चिपचा तुटवडा आहे. त्यामुळे वाहनांच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली हाेती. मात्र, चिप तुटवड्याचा परिणाम वाहनांच्या पुरवठ्यावर झाला. कंपन्यांनी त्यावर मात करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तरीही वाहनविक्री घटली आहे. देशातील सर्वात माेठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाची कारविक्री २४ टक्क्यांनी घटली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टाेबरमध्ये १ लाख ३८ हजार ३३५ वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी ऑक्टाेबरमध्ये हाच आकडा १ लाख ८२ हजार ४४८ एवढा हाेता. 

दुचाकी विक्रीवर परिणामदुचाकी वाहनांच्या विक्रीतही घट नाेंदविण्यात आली आहे. बजाज ऑटाे आणि टीव्हीएस माेटर्सने अनुक्रमे १४ आणि १० टक्के घट नाेंदविली आहे. बजाजच्या ४ लाख ३९ हजार ६१५ वाहनांची विक्री झाली. तर टीव्हीएसने ३ लाख ५५ हजार ३३ दुचाकी विक्री केली. कंपनीने याच कालावधीत गेल्या वर्षी ३ लाख ९४ हजार दुचाकी विकल्या हाेत्या. तर बजाज ऑटाेने गेल्या वर्षी ५ लाख १२ हजार वाहनांची विक्री केली हाेती. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीतही २२ टक्के घट झाली आहे. तसेच निर्यातीमध्येही ४ टक्के घट नाेंदविण्यात आली. त्या तुलनेत टीव्हीएसच्या निर्यातीत ३ टक्के वाढ झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत वाढअशाेक लेलँडच्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत ११ टक्के वाढ झाली आहे. ऑक्टाेबरमध्ये ११ हजार ७९ वाहनांची विक्री झाली. याशिवाय आयशर माेटर्स समूहाने ३८ टक्के वाढ नाेंदविली आहे. कंपनीने ५ हजार ८०५ वाहनांची विक्री केली.