पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींपासून आता शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. टर, कार आणि बसेसनंतर आता सीएनजी बसविण्यात आलेले ट्रॅक्टरही रस्त्यावर आणि शेतात फिरताना दिसणार आहेत. कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पहिला सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर लाँच केला आहे. फक्त हा सीएनजी गावागावात पोहोचलेला नसल्याने ग्रामीण भागात या ट्रॅक्टरला वापर होणे फारच अवघड आहे. तसेच जिथे सीएनजी आहे तिथे हा ट्रॅक्टर सीएनजी पंपावर ने-आण करणे देखील जिकीरीचे आहे. (Nitin Gadkari launched country's first CNG tractor.)
यावेळी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री व्ही.के. सिंह आणि राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला उपस्थित होते. यावेळी गडकरींनी देशातील शेतकरी या ट्रॅक्टरचा वापर करून दीड लाख रुपये वाचवू शकणार असल्याचे म्हटले आहे. शेतकरीडिझेलवर वर्षाला सरासरी 3 ते 3.5 लाख रुपये खर्च करतो. सीएनजीच्या वापराने तो हा खर्च दीड लाखांनी कमी करू शकणार आहे. डिझेलचा ट्रॅक्टरदेखील सीएनजीवर कन्वर्ट करता येणार आहे. याचेही फायदे आहेत, असे गडकरी म्हणाले.
असे होतील फायदे..रावमेट टेक्नो सोल्यूशन्स आणि टोमॅसेटो अचिली इंडियाद्वारे (Rawmatt Techno Solutions and Tomasetto Achille India) सीएनजी बसविण्यात आलेल्या ट्रॅक्टरचा फायदा शेतकऱ्यांना होईल. आता सीएनजी ट्रॅक्टर आल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा आहे. सीएनजी एक स्वच्छ इंधन आहे, ज्यामुळे कार्बन आणि इतर प्रदूषित कण फार कमी उत्सर्जित होतात. नवीन तंत्रज्ञानाद्वारे रूपांतरित सीएनजी इंजिनचे आयुष्य पारंपारिक ट्रॅक्टरपेक्षा जास्त असेल. डिझेलच्या तुलनेत सीएनजी ट्रॅक्टरचे मायलेज खूप जास्त असेल. एवढेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज चढ-उतार होत असतात, या तुलनेत सीएनजीच्या चढ-उतारांच्या किंमती खूप कमी असतात.
स्वस्त आहे सीएनजीपेट्रोल किंवा डिझेलपेक्षा सीएनजी खूप स्वस्त आहे. सीएनजी टँक टाइटपासून सील असल्यामुळे रिफ्यूलिंगच्यावेळी स्फोट होण्याचे प्रमाण कमी असते. वेस्ट टू वेल्थ म्हणजेच कचऱ्यापासून मौल्यवान वस्तू बनविण्याच्या पर्यायाला पुढे आणखी बळकटी मिळते. पेंढ्यांचा वापर बायो सीएनजी तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे केवळ शेतकऱ्यांचे उत्पन्नच वाढत नाही तर पेंढ्या जाळल्यामुळे होणारे प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल.
सीएनजी ट्रॅक्टरांमुळे असेही होतील फायदेकाही स्डटीनुसार, डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरांच्या तुलनेत सीएनजी ट्रॅक्टर्संना जास्त पॉवर मिळते. डिझेलच्या तुलनेत सीएनजीपासून 70 टक्के कमी उत्सर्जन होते. सीएनजी ट्रॅक्टर वापरल्याने शेतकऱ्यांचा इंधन खर्च 50 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल. समजा, राजधानी दिल्लीत डिझेलची किंमत प्रतिलिटर 78.03 रुपये आहे, तर सीएनजी 42.70 रुपये प्रति किलो आहे.