शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

Volkswagen च्या 'या' SUV वर मिळतोय 4 लाख 20 हजार रुपयांचा तगडा डिस्काउंट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 3:44 PM

Volkswagen Cars Discount Offers: तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर या कारवर एक नजर टाका.

Volkswagen Cars Discount Offers: दिवाळी संपली, पण अजूनही तुम्ही नवीन कार खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट मिळवू शकता. ज्यांनी दिवाळीच्या काळात ऑफर्स चुकवल्या, त्यांच्यासाठी एक चांगली संधी आली आहे. Volkswagen ने त्यांच्या SUV वर 4.20 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट जाहीर केला आहे. ही ऑफर 30 नोव्हेंबरपर्यंत आहे.

युरोपियन कार कंपनी Volkswagen भारतात तिगुआन, तैगुन आणि व्हरटस, हे तीन मॉडेल भारतात विकते. आता कंपनी या कार्सवर रोख लाभ, एक्सचेंज ऑफर आणि लॉयल्टी बोनसद्वारे सूट देत आहे. तुम्ही या सवलतीचा फायदा 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत घेऊ शकता.

Volkswagen Tiguan: ₹4.20 लाखांपर्यंत सूटकंपनी Volkswagen Tiguan वर 4.20 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही SUV खरेदी केल्यावर 75,000 रुपयांपर्यंतचा रोख लाभ आणि 75,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. याशिवाय 1,00,000 रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट फायदेही मिळू शकतात. सोबतच, 4 वर्षांसाठी 85,999 रुपये किमतीचे मोफत SVP आणि 84,000 रुपयांपर्यंतचे विशेष फायदे स्वतंत्रपणे मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला 4.20 लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या 5 सीटर SUV ची एक्स-शोरूम किंमत 35.17 लाख रुपयांपासून सुरू होते.

Volkswagen Taigun: ₹1 लाख पर्यंत सूटVolkswagen Taigun ही एक छोटी 5 सीटर SUV आहे, जी 5 स्टार GNCAP सुरक्षा रेटिंगसह येते. या कारची एक्स-शोरूम किंमत 11.62 लाख ते 19.76 लाख रुपये आहे. फोक्सवॅगनवर 40,000 रुपयांपर्यंतचे फायदे उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्हाला 60,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज आणि लॉयल्टी फायदे मिळतील. या कारवर तुम्हाला एकूण 1 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे.

Volkswagen Virtus: ₹ 80 हजार पर्यंत सूटफोक्सवॅगनच्या ताफ्यात एक उत्कृष्ट सेडान, Virtus देखील आहे. भारतात या कारची एक्स-शोरूम किंमत 11.47 लाख रुपयांपासून सुरू होते. जर तुम्ही ही सेडान नोव्हेंबरमध्ये खरेदी केली तर तुमची 80 हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. Virtus खरेदीवर 40,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत. 40,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज आणि लॉयल्टी फायदे ऑफरमध्ये समाविष्ट आहेत.

टॅग्स :Volkswagonफोक्सवॅगनcarकारAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग