Volkswagen Group's Companies: जगातील सर्वात महागड्या आणि आलिशान गाड्या कोणत्या? असा प्रश्न तुम्हाला विचारल्यावर तुम्ही पोर्श, लॅम्बोर्गिनी, बेंटले आणि ऑडी अशा गाड्यांचे नाव घ्याल. पण, एक गोष्टी तुम्हाला माहित नाही. ती म्हणजे, तुम्ही पोर्शे, लॅम्बोर्गिनी, बेंटले किंवा ऑडीची कार विकत घेतली, तरीदेखील पैसे फोक्सवॅगन (Volkswagen) कंपनीलाच मिळतात. असे का होते? जाणून घेऊ...
Audi, Bentley किंवा Porsche, या सर्व ब्रँडची स्वतःची वेगळी ओळख आहे, परंतु या सर्व गाड्या Volkswagen कंपनीच्याच आहेत. या सर्व गाड्यांची मालकी फोक्सवॅगन ग्रुपकडे आहे. फक्त याच कंपन्या नाही, तर इतर अनेक लोकप्रिय गाड्या फोक्सवॅगन ग्रुपच्या अंतर्गत येतात. त्यामुळे तुम्ही या गाड्या खरेदी केल्यानंतर पैसे Volkswagen समूहाकडेच जातात.
विशेष म्हणझे, Volkswagen ग्रुपकडे 10 पेक्षा जास्त कंपन्यांची मालकी आहे, ज्यात व्यावसायिक वाहन, बाईक आणि कार कंपन्यांचा समावेश आहे. फोक्सवॅगन ही स्वतःदेखील कार बनवणारी कंपनी आहे. फोक्सवॅगन ग्रुपमध्ये फोक्सवॅगन, ऑडी, सीट, कुप्रा, स्कोडा, बेंटले, लॅम्बोर्गिनी, पोर्श, डुकाटी, ट्रॅटॉन एसई, कॅरिअड, फोक्सवॅगन ग्रुप टेक्नॉलॉजी, एमओआयए आणि फोक्सवॅगन कमर्शियल व्हेइकल्सचा समावेश आहे.
फोक्सवॅगन ग्रुप ही जगातील आघाडीच्या कार कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे मुख्यालय वुल्फ्सबर्ग, जर्मनी येथे आहे. ग्रुपचा विस्तार 19 युरोपियन देशांसह अमेरिका, आशिया आणि आफ्रिकेतील 10 देशांमध्ये आहे. कंपनीचे जगभरात अंदाजे 6,76,000 कर्मचारी आहेत. हा समूह 150 हून अधिक देशांमध्ये वाहने विकतो.