नवी दिल्ली : फोक्सवॅगनने (Volkswagen) ऑक्टोबर 2022 मध्ये निवडक कारच्या किमती 2 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. कंपनीने 2022 मध्ये दुसऱ्यांदा आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. याआधी कंपनीने मे 2022 मध्ये आपल्या कारच्या किमती वाढवल्या होत्या. वाढलेल्या किमती 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात आल्या आहेत.
कंपनीने फोक्सवॅगन टाइगुन, व्हर्टस आणि टिगुआन या गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत. या दरवाढीनंतर फोक्सवॅगनची कार खरेदी करण्यासाठी 71,000 रुपयांपर्यंत अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. फोक्सवॅगनने वाढवलेल्या किमतींनंतर कोणत्या कार खरेदीसाठी इतके पैसे मोजावे लागतील. यासंदर्भात जाणून घ्या...
Volkswagen Tiguanफोक्सवॅगन टिगुआन ही प्रीमियम SUV असून कंपनीने 71,000 रुपयांची सर्वाधिक दरवाढ केली आहे. या मोठ्या वाढीनंतर या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 32.79 लाख रुपयांवरून 33.50 लाख रुपये झाली आहे. टिगुआनमध्ये कंपनीने 2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 190 PS पॉवर आणि 320 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 7 स्पीड DSG ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
Volkswagen Taigunफोक्सवॅगन टिइगुन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता ती खरेदी करण्यासाठी 26,000 रुपये अधिक द्यावे लागतील. किंमत वाढल्यानंतर त्याची किंमत 11.39 लाख रुपयांवरून 11.65 लाख रुपये झाली आहे. कंपनीने याआधी मे 2022 मध्ये या कारच्या किमती वाढवल्या होत्या, ज्यामध्ये या कारची किंमत 10.5 लाख रुपयांवरून 11.39 लाख रुपये झाली होती.
कारच्या इंजिन आणि ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने दोन इंजिनचा पर्याय दिला आहे, ज्यामध्ये पहिल्या इंजिनला 3 सिलेंडरसह 1.0 लिटर टर्बोचार्ज केलेले आणि 4 सिलेंडरसह 1.5 लिटर टर्बोचार्ज केलेले इंजिन दिले आहे. या दोन्ही इंजिनांसह, कंपनीने 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टरचा पर्याय देखील दिला आहे, जो याच्या TSI सोबत उपलब्ध आहे.
Volkswagen Virtusफोक्सवॅगन व्हर्टस ही सेडान सेगमेंटची कार आहे, जी खरेदी करण्यासाठी 10 ते 50 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील. कंपनीने या सेडानच्या विविध व्हेरिएंटनुसार किंमत 10 ते 50 हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. या वाढीनंतर, या सेडानच्या सुरुवातीच्या व्हेरिएंटची नवीन किंमत 11.32 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) वर गेली आहे, जी टॉप व्हेरिएटमध्ये जाऊन 18.42 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) झाली आहे. .
फोक्सवॅगन व्हर्टसमध्ये कंपनीने दोन इंजिनांचा पर्याय दिला आहे, ज्यामध्ये पहिल्या इंजिनला 1.0 लिटर TSI इंजिन आणि दुसरे 1.5 लिटर TSI इंजिन देण्यात आले आहे. त्याचे पहिले इंजिन 1.0 लीटर TSI इंजिन 113 hp ची कमाल पॉवर आणि 178 Nm पीक टॉर्क जनरेट करते. दुसरे 1.5-लिटर TSI डिझेल इंजिन आहे, जे 148 hp पॉवर आणि 250 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही दोन्ही इंजिने 7-स्पीड DSG ट्रान्समिशनशी जोडलेली आहेत.