- सुवासित दत्त नवी दिल्ली- स्वीडनची प्रसिद्ध कार कंपनी वॉल्व्होनं भारतातील स्वतःच्या कार व्यवसायाचा पसारा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी 4 जुलै रोजी सर्वात छोटी एसयूव्ही Volvo XC40 ही कार भारतात लाँच करणार आहे. भारतात लाँच होण्याआधीच Volvo XC40 कारची कामगिरी आम्ही तपासून पाहिली आहे.Volvoच्या कार या दिसण्यात फारच सुंदर असतात. कारची हीच शान कंपनीनं Volvo XC40मध्येही कायम ठेवली आहे. Volvo XC40 या कारला खूपच आकर्षक पद्धतीनं डिझाइन करण्यात आलं आहे. Volvo XC40 ही कार भारतात R-Designमध्येही उपलब्ध होणार आहे. Volvo XC40 कारची लांबी आणि रुंदी Audi Q3, BMW X1 आणि Mercedes Benz GLA या कारपेक्षा जास्त आहे. वॉल्व्होची ही कार स्पोर्टी लूकमध्ये पाहायला मिळते.Volvo XC40च्या बाहेरील बाजूस पाहिल्यास यात एसयूव्हीमध्ये ऑल ब्लॅक फ्रंट ग्रील बसवण्यात आले आहेत. ज्यावर कंपनीचा लोगोसुद्धा आहे. कारच्या समोरील भाग हा ब्रॉड आणि सुंदर आहे. कारच्या एलईडी डे टाइम रनिंग लाइटही जबरदस्त आहेत. Volvo XC40मध्ये 18 इंचाच्या एलॉय व्हीलबरोबरच पिरेली टायर्सही बसवण्यात आले आहेत.Volvo XC40 या कारचा मागील भागही सुंदर असून, मागच्या बाजूला टेल लाइटची व्यवस्था केली आहे. तसेच या कारमध्ये पुढच्या दोन सीटसाठी एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. कारमध्ये बसल्यानंतर इंटिरियर किती लाजबाव आहे, याचा तुम्हाला अंदाज येऊ शकेल. Volvo XC40मध्ये ब्लॅक इंटिरियर देण्यात आलं आहे. तसेच कारमधल्या फ्लोअर आणि डोर पॅनलला नारंगी रंग देण्यात आला आहे. Volvo XC40मधला इंटिरियर स्पेसही मस्त आहे.या एसयूव्ही कारमध्ये पॅनारोमिक सनरूफ, मल्टी फन्क्शनल स्टिअरिंग व्हील, डिजिटल इन्स्ट्रुमेंड क्लस्टर, 9 इंचाचं व्हर्टिकल टचस्क्रीनसह सेन्सर इन्फोटेन्मेंट सिस्टीम देण्यात आलं आहे. कारमधील इंफोटेन्मेंट सिस्टम हाताळण्यासही फार सोपं आहे.Volvo XC40मध्ये 13 स्पीकर असलेले Harmon Kardon ऑडिओ सिस्टीम बसवण्यात आलं आहे. त्याचा आवाज जबरदस्त आहे. Volvo XC40मध्ये स्पीकर्स डोअर्सच्या ऐवजी डॅशबोर्डवर बसवण्यात आले आहेत.कारमधल्या इन्फोटेन्मेंट सिस्टीममध्ये अॅफल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सुविधा देण्यात आली आहे. त्याशिवाय कारमध्ये वायरलेस चार्जिंग सिस्टीम बसवण्यात आली असून, त्यामुळे तुम्ही वायरशिवाय स्मार्टफोन चार्ज करू शकता. Volvo XC40 कारमधल्या सीटही फार आरामदायी आहेत.पुढच्या सीटवर दोन माणसे आरामात बसू शकतात. या कारमध्ये बसण्यासाठी पुरेशी जागा देण्यात आली आहे. कारमध्ये 460 लीटरचा बूट स्पेस आहे. त्यामुळे पिकनिकला जाताना तुम्हाला भरपूर सामान घेऊन जाणं शक्य होणार आहे. Volvo XC40 ही कार फक्त डिझेल इंजिन पर्यायातच उपलब्ध होणार आहे.Volvo XC40मध्ये 2.0 लीटर, 4 सिलिंडर डिझेल इंजिनच्या पर्यायाबरोबरच 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशननी युक्त आहे. या कारमध्ये 190 बीएचपी पॉवरच्या इंजिनाचा वापर करण्यात आला असून, 400Nmचा टॉर्क दिला आहे. शहरातल्या वाहतुकीच्या कोंडीत या कारच्या इंजिनमधून काहीसा आवाज येऊ शकते. परंतु मोकळ्या महामार्गावर ही कार सुस्साट धावू शकते. Volvo XC40चा स्टिअरिंग रिस्पॉन्सही चांगला आहे.स्पीडमध्ये असताना अचानक ब्रेक मारल्यास कारवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. कारमध्ये अॅजस्टिव्ह क्रूज कंट्रोल आणि पायल असिस्टसारख्या अत्याधुनिक सुविधांमुळे तुम्हाला गाडी चालवतानाही मजा येते. अनेक सेफ्टी फीचर्समुळे ही एसयूव्ही कार अनेक कारना टक्कर देण्यास सज्ज आहे.Volvo XC40 या कारमध्ये सिटी सेफ्टी यंत्रणा देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला शेजारील गाड्यांची माहिती मिळणार आहे. तुम्ही योग्य वेळी गाडी न थांबवल्यास गाडी आपोआप थांबते, अशी यंत्रणा गाडीत दिली आहे. Volvo XC40मध्ये 8 एअरबॅग्ज, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, टॅक्शन कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, पायलट असिस्ट, क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, ब्रेक सपोर्ट, डिसेंट कंट्रोल, पार्किंग असिस्ट, वॉल्वोह सिटी सेफ्टी, ऑन कमिंग लेन मिटिगेशन, अॅडजस्टिव्ह क्रूज कंट्रोल, ब्लाइंट स्पॉट इन्फॉर्मेशन आणि रन ऑफ रोड मिटिगेशन सिस्टीम इतक्या सुविधा देण्यात आल्या आहेत.या सर्व सुविधांमुळे Volvo XC40 असा अंदाज वर्तवला जात आहे. Volvo XC40 या कारची बुकिंग सुरू झाली असून, 4 जुलै रोजी ही कार बाजारात उपलब्ध होणार आहे. Volvo XC40 या कारची अंदाजे किंमत 43 ते 45 लाखांच्या आसपास असू शकते. आता कंपनीनं भारतात या कारची किंमत काय ठरवते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.