वॉल्वो कार इंडियाच्या वतीने नुकतेच मुंबईत नवीन अत्याधुनिक बॉडीशॉपचे उद्घाटन करण्याची घोषणा करण्यात आली. ज्यामुळे ऑटोमोटिव्ह रिपेयर उद्योगात नवीन मापदंड प्रस्थापित झाले. KIFS वॉल्वो कार्सच्या देखरेखीखाली ही आधुनिक सुविधा, ग्राहकांना अतुलनीय सेवा देण्यासाठी टिकाऊपणा स्वीकारत, नुकसान आणि दुरुस्तीची पूर्तता करताना उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
वर्कशॉप क्रॅश रिपेयर आणि कार बॉडीच्या मोजमापासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, ज्यामुळे विविध मॉडेल प्रकार आणि कार बॉडीच्या संरचनांसाठी अचूक मूल्यांकन आणि सुव्यवस्थित दुरुस्ती सुनिश्चित होते. वर्कशॉपची क्षमता कार बॉडी संरचनांसाठी 3डी मापन प्रणालींपर्यंत विस्तारली आहे. संरेखन आणि कार रचनांच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्च अचूकता प्रदान करते. ज्यामुळे वॉल्वो कारच्या सुरक्षिततेच्या मुख्य प्रस्तावांशी तडजोड न करता निर्दोष कार बॉडीची दुरुस्ती शक्य होते. शिवाय, यात एक प्रगत लेदर रिपेयर अॅप्लीकेशन लेदर सीटचे रंग पुनर्संचयित म्हणजे रिस्टोअर करणे, किरकोळ भेगा आणि आकुंचन निश्चित करणे, दर्जेदार ऑटोमोटिव्ह सेवांसाठी एक नवीन मानक स्थापित करणे यासारखी कामे हाताळतो. वॉल्वो कार्सची शाश्वतता आणि पर्यावरणाशी निगडीत उच्च मानके लक्ष केंद्रित करून, हे बॉडीशॉप पारंपरिक ऊर्जा, सांडपाणी व्यवस्थापन आणि जल संवर्धनासाठी सौर ऊर्जेचा वापर करते.
"आमच्या ग्राहकांना उत्तम दर्जाची सेवा आणि सुविधा प्रदान करणे हे वॉल्वो कार इंडियाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. मुंबईतील आमचे नवीन बॉडीशॉप हा त्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञांच्या समर्पित टिमसह, आम्ही त्वरित दुरुस्ती हाताळण्यासाठी आणि आमच्या ग्राहकांच्या गरजांसाठी सर्वसमावेशक उपाय प्रदान करण्यासाठी सुसज्ज आहोत", असे वॉल्वो कार इंडिया’च्या मॅनेजिंग डायरेक्टर ज्योती मल्होत्रा म्हणाले.
मुंबईत आमचे अत्याधुनिक बॉडीशॉप सादर करताना आम्हाला आनंद होतो आहे. भारतातील वाहन दुरुस्ती मानकांची पुनर्रचना करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणावे लागेल. उच्च दर्जाची सेवा आणि सुविधा प्रदान करण्याची आमची बांधिलकी या आधुनिक सुविधेमध्ये प्रतिबिंबित होते. जी क्रॅश रिपेयर, कार बॉडी मोजमाप आणि लेदर रिस्टोरेशनसाठी प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या नवीन बॉडीशॉपसह, वॉल्वो कार इंडियाचे उद्दिष्ट आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतुलनीय सेवा आणि सर्वसमावेशक उपाय उपलब्ध करून देण्याचे आहे.” असे KIFS वॉल्वो कार्स’चे मॅनेजिंग डायरेक्टर विमल खंडवाला म्हणाले.
भारतातील वॉल्वो कार्स
स्वीडिश लक्झरी कार कंपनी वॉल्वो’च्या वतीने 2007 मध्ये भारतात आपले अस्तित्व प्रस्थापित केले. तेव्हापासून देशात स्वीडिश ब्रँडच्या विपणनासाठी सखोल प्रयत्न केले आहेत. वॉल्वो कार्स सध्या अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, कोईम्बतूर, दिल्ली एनसीआर-दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, इंदूर, रायपूर, जयपूर, कोची, कोझीकोड, कोलकाता, लखनऊ, लुधियाना, पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, पुणे, रायपूर, सुरत, विशाखापट्टणम आणि विजयवाडा येथे 25 डीलरशिपद्वारे उत्पादनांची विक्री करते.