नवी दिल्ली : स्वीडनची प्रसिद्ध कार कंपनी Volvo ने भारतात आपली नवी एसयूव्ही Volvo XC40 कार लॉन्च केली आहे. भारतीय ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन कंपनीने ही कार तयार केली आहे.
किती आहे कारची किंमत?
Volvo XC40 कारचं डिझाइन अधिक आकर्षक आणि फ्रेश करण्यात आलं आहे. भारतात केवळ ही एकच एसयूव्ही ट्रिम R-Design मध्ये उपलब्ध होईल. Volvo XC40 या कारची लांबी व रुंदी Audi Q3, BMW X1 Mercedes Benz GLA या कार पेक्षा जास्त आहे. Volvo XC40 या कारची एक्स-शोरुम किंमत 39.90 लाख रुपये इतकी ठेवण्यात आहे.
काय आहे कारची खासियत?
Volvo XC40 इंटेरिअर सुद्धा आकर्षक करण्यात आलं आहे. कारमध्ये सगळं काळ्या रंगाचं इंटेरिअर देण्यात आलं आहे. तर डोअर कलर आणि फ्लोरवर ऑरेंज कलर देण्यात आला आहे. हेच या कारला इतर कारपेक्षा वेगळं ठरवते. Volvo XC40 या कारमध्ये 13 स्पीकरचा Harmon Kardon ऑडिओ सिस्टम देण्यात आलाय.
Volvo XC40 या कारमध्ये सरक्षेसाठी 8 एअरबॅग्स, अॅंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलीटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, पायलट असिस्ट, क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, ब्रेक सपोर्ट, डिसेंट कंट्रोल, पार्किंग असिस्ट, वॉल्वो सिटी सेफ्टी, ऑन लेन मिटिगेशन यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
Volvo XC40 ही कार केवळ डिझेल इंजिन पर्यायात उपलब्ध असेल. Volvo XC40 मध्ये 2.0 लिटर, 4 सिलेंडर डिझेल इंजिन देण्यात आलंय.