भारताला फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगची पहिली कार देणाऱ्या टाटाच्या भात्यातही फाईव्ह स्टार रेटिंगची सेडान कार नाहीय. टाटाच्या टिगॉरला फोर स्टार ग्लोबल एनकॅप रेटिंग आहे. असे असताना दोन कंपन्यांनी कमाल करून दाखविली आहे. मारुतीला तर कदापी शक्य नाही, परंतू फोक्सवॅगन आणि स्कोडाने दोन सेदान कारना 5 स्टार GNCAP सेफ्टी रेटिंग मिळवून दाखविले आहे.
Skoda in India: स्कोडाचा भारतात खप किती?; आकडा बघून आश्चर्याचा धक्का बसेल
युरोपियन कार कंपन्या फोक्सवॅगन आणि स्कोडाने भारतात बनविलेल्या या कार ग्लोबल एनकॅपकडे क्रॅश टेस्टसाठी पाठविल्या होत्या. फोक्सवॅगनच्या व्हर्टुस आणि स्कोडाच्या स्लाव्हियाची क्रॅश टेस्ट करण्यात आली. दोन्ही कारना फाईव्ह स्टार रेटिंग मिळाली आहे. संस्थेने याची माहिती वेबसाईटवर अपलोड केली आहे. एप्रिलमध्येच ही टेस्ट करण्यात आली आहे.
ग्लोबल एनकॅपच्या माहितीनुसार या कार भारतीय बाजारपेठेसाठीच बनविण्यात आल्या होत्या. चाचणी दरम्यान या कारची वेगवेगळ्या पद्धतीने टेस्ट घेण्यात आली. यामध्ये प्रौढ आणि मुलांसाठी या कार पूर्णपणे सुरक्षित असल्याचे समोर आले आहे.
वर्टुस आणि स्लाव्हिया दोन्ही मध्यम आकाराच्या सेडान कार आहेत. फॉक्सवॅगन आणि स्कोडा या मध्यम आकाराच्या एसयूव्हीचीही यापूर्वी क्रॅश चाचणी झाली होती. यात या कारना देखील फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. यामुळे या कंपन्यांच्या ताफ्यात आता दोन-दोन फाईव्ह स्टार रेटिंगवाल्या कार आल्या आहेत.