नवी दिल्ली : मारुती सुझुकी ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. सध्या देशात मायक्रो एसयूव्हीचा सेगमेंट वेगाने वाढत आहे. या सेगमेंटची सुरुवात टाटा पंच एसयूव्हीने झाली होती. टाटाच्या एसयूव्हीला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर ह्युंदाईने ( Hyundai) आपली पहिली मायक्रो एसयूव्ही ह्युंदाई Exter लाँच केली आहे. याशिवाय, मारुती सुझुकीने मारुती फ्रॉन्क्स (Fronx) ही सर्वात स्वस्त एसयूव्ही म्हणून आणली आहे. Fronx लाँच झाल्याच्या पुढच्याच महिन्यात या कारचा टॉप १० सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत समावेश झाला आहे.
मारुती सुझुकीने या वर्षी एप्रिलमध्ये देशात Fronx एसयूव्ही सादर केली आणि तिची किंमत ७.४६ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू झाली. ही कार मारुती बलेनोवर आधारित आहे. या एसयूव्हीला आर्कटिक व्हाइट, ग्रॅंड्युअर ग्रे, अर्थन ब्राउन, स्प्लिंडिड सिल्व्हर आणि ऑप्युलंट रेड असे नऊ कलर ऑप्शन देण्यात आले आहेत. सध्या दिल्लीत या कारसाठी १४ आठवड्यांपर्यंत वेटिंग पीरियड (प्रतीक्षा कालावधी) आहे. हा प्रतीक्षा कालावधी सिग्मा, डेल्टा, डेल्टा+, झेटा आणि अल्फा या संपूर्ण व्हेरिएंट रेंजसाठी लागू आहे.
भारतीय बाजारपेठेत मारुती Fronx ची किंमत ७.४७ लाख रुपयांपासून सुरू होते. तर टॉप व्हेरिएंटसाठी १३.१४ लाख रुपयांपर्यंत मोजावे लागतात. मारुती Fronx मध्ये १.२ लिटर, चार-सिलिंडर, NA पेट्रोल इंजिन आहे जे ८९ bhp आणि ११३ Nm टॉर्क आउटपुट करते आणि १.० लिटर, तीन-सिलिंडर, टर्बो-पेट्रोल इंजिन जे ९९ bhp आणि १४७ Nm टॉर्क जनरेट करते. गिअरबॉक्स ऑप्शनमध्ये पाच-स्पीड मॅन्युअल युनिट, एक AMT युनिट आणि सहा-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर युनिटचा समावेश आहे.
या एसयूव्हीच्या सेफ्टीबद्दल बोलायचे झाल्यास, या कारला सहा एअरबॅग्ज, ३६०-डिग्री कॅमेरा, HUD, नऊ इंची स्मार्ट प्ले प्रो+ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, क्रूझ कंट्रोल, यूव्ही कट ग्लासेस, रिअर एसी व्हेंट्स आणि एक वायरलेस चार्जर मिळतो. दरम्यान, या Fronx कारची स्पर्धा Hyundai Venue, Kia Sonet, Renault Kiger, Nissan Magnite, Mahindra XUV300 आणि Tata Nexon यांच्याशी आहे.