शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

कमी बजेटमध्ये हवी मोठी कार?; १० लाखाहून कमी किमतीत मिळतात 'या' ७ सीटर गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2022 2:48 PM

लवकरात लवकर निवडा तुमची आवडती सात सीटर कार.

Seven Seaters Cars Under 10 Lakh: जर तुमचे कुटुंब मोठे असेल, तुम्हाला एकत्र लांबच्या सहलीला जायचे असेल तर तुमचे संपूर्ण कुटुंब एकाच गाडीने एकत्र जावे अशी तुमची इच्छा असेल. जर तुम्हालाही ही इच्छा पूर्ण करायची असेल पण तुमचे बजेट कमी आहे, तर आम्ही तुम्हाला अशाच काही सात सीटर वाहनांबद्दल सांगणार आहोत ज्यांची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी आहे. मग आता उशीर कशाचा, लवकरात लवकर निवडा तुमची आवडती सात सीटर कार.

मारुती सुझुकी एर्टिगा पेट्रोल आणि सीएनजी इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कार पेट्रोलवर २०.५१ किमी/प्रतिलीटर आणि सीएनजीवर २६.११ किमी/किलो मायलेज देते. या कारचा मेंटेनन्स खर्च खूपच कमी आहे. तसेच याचे अनेक व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत. या ७ सीटर कारची एक्स-शोरूम किंमत ८.४१ लाख रुपये आहे.Renault Triber रेनॉल्टच्या या कारमध्ये 1.0L पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे बाजारात एकूण दहा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या कारला NCAP कडून ४ स्टार सुरक्षा रेटिंग देखील आहे. ही देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर कार मानली जाते. या कारची एक्स-शोरूम किंमत ५.९१ लाख रुपये आहे. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगली ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

Mahindra Bolero Neoमहिंद्रा बोलेरोचा ही स्पेशल व्हेरिएंट आहे. या ७ सीटर कारला १७.८ सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, क्रूझ कंट्रोल, फ्रंट आणि रियर पॉवर विंडो, पॉवरफुल एसी, ऑटोमॅटिक डोअर लॉक, EBD, ABS, ISOFIX चाइल्ड सीट्स, प्रशस्त बूट स्पेस, फॅब्रिक सीट्ससह इटालियन इंटिरियर्स मिळतात. एअरबॅग्ज सारखी उत्तम वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. या वाहनाची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ९.२९ लाख रुपये आहे.

Kia CarensKia Carens ला 1.5L, CRDi VGT डिझेल, Smartstream 1.4-L T-GDi पेट्रोल आणि Smartstream 1.5-लीटर पेट्रोल सारख्या तीन इंजिनांचा पर्याय मिळतो. या वाहनाचे ५ व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत. यात 7-स्पीड DCT, 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे तीन पर्याय आहेत. या कारची किंमत ९.५९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

Mahindra Bolero महिंद्राच्या अत्यंत लोकप्रिय ७ सीटर कारमध्ये 1.5L, 3-सिलेंडर, mHawk 75 डिझेल इंजिन आहे. एअरबॅग्ज, एबीएस, म्युझिक सिस्टीम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि डिजिटल क्लस्टर सारखी वैशिष्ट्ये या वाहनात उपलब्ध आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत ९.८५ लाख रुपये आहे.