स्वत:चे एक घर आणि त्यासमोर एक चारचाकी, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतू घरखर्च, वाढती महागाई अपुरे वेतन किंवा कर्ज घेण्यासाठी अधिकृत कागदपत्रे नसणे आदी अनेक संकटे असतात. मात्र, दिवसाला 154 रुपये मोजूनही तुम्ही स्वमालकीची कार घेऊ शकता. हो, तुम्ही बरोबर वाचलाय. ही भारतातील सध्याची सर्वात स्वस्त (Cheapest car in India) सर्वाधिक खपाची कार आहे.
या लो बजेट सेगमेंटमध्ये कार खरेदी करताना पैशांसोबत प्लॅनिंगही गरजेचे आहे. Maruti Suzuki Alto हा कमी बजेटमध्ये चांगला पर्याय आहे. मारुती सुझुकी अल्टोच्या बेस व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत 3,15,000 रुपये आहे. म्हणजेच ऑनरोड किंमत ही साडेतीन लाख किंवा पावणे चार लाखांपासून सुरु होते.
जर तुमच्याकडे हातात 50000 रुपये असतील तर ते डाऊनपेमेंटसाठी भरून तुम्ही ही कार खरेदी करू शकता. साडे तीन लाखांपैकी 50 हजार भरले तर तुम्हाला तीन लाखांचे कर्ज काढावे लागेल. तीन, पाच आणि सात वर्षांसाठी तुम्ही हे कर्ज काढू शकता. जर तुम्ही एसबीआयकडून कर्ज घेतले तर तुम्हाला 7.70 ते 13.25 टक्के व्याज बसेल. जर तुम्ही 7.70 टक्के व्याजदराने मारुति सुजुकी अल्टो वर 7 वर्षांचे कर्ज घेतले तर तुम्हाला महिन्याला 4,622 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.
7.70 टक्के व्याजदराने 88,834 रुपये व्याज भरावे लागेल. म्हणजे तुम्हाला Maruti Suzuki Alto घेण्यासाठी सात वर्षांनी 88,834+ 2,99,383+ 50000= 438,217 रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजेच दिवसाला 171.51 रुपये पडणार आहेत. यातून 50000 वजा केले तर तुम्हाला कर्जासाठी दिवसाला 151.94 रपये बाजुला काढावे लागणार आहेत.