शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Top 10 Cars Waiting Period: कार घ्यायचीये? क्रेटा, विटारा ते थार आणि स्कॉर्पिओपर्यंत; मोठा वेटिंग पीरिअड, बुक करण्यापूर्वी पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 9:44 PM

Top 10 Cars Waiting Period: सध्या तुम्ही कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सध्या बहुतांश कंपन्यांच्या कार खरेदीसाठी मोठं वेटिंग आहे.

जर तुम्ही आता SUV किंवा MPV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याचा वेटिंग पीरिअडदेखील माहित असणे आवश्यक आहे. कारण वाहनांची वाढती मागणी असताना चिप-सेमीकंडक्टरची समस्या अजूनही कायम आहे. तसेच, वाहनांमधील 6 एअरबॅगसह अनेक ॲडव्हान्स्ड फीचर्समुळे उत्पादनात विलंब होत आहे. अशा स्थितीत अनेक वाहनांचा वेटिंग पीरिअड 18 महिन्यांपर्यंत म्हणजेच दीड वर्षांपर्यंत पोहोचला आहे. 

म्हणजेच, जर तुम्ही फेब्रुवारी 2023 मध्ये वाहन बुक केले तर त्याची डिलिव्हरी ऑगस्ट 2024 मध्ये उपलब्ध होईल. तथापि, काही कारसाठी हा वेटिंग पीरिअड 7 महिन्यांची आहे. म्हणजेच, तुम्ही आजच बुक केल्यास तुम्हाला त्यांची डिलिव्हरी सप्टेंबर 2023 मध्ये मिळेल. म्हणजेच गणेश चतुर्थीच्या काळात कार उपलब्ध होईल, असेही गृहीत धरले जाऊ शकते.

टोयोटा हायक्रॉसचा वेटिंग पीरिअड सर्वात मोठा आहे. ही कार आज बुक केल तर त्याची डिलिव्हरी तुम्हाला 18 महिन्यांनंतर मिळेल. त्याचप्रमाणे महिंद्रा थारवर 17 महिने, टोयोटा हायराइडरवर 15 महिने, महिंद्रा स्कॉर्पिओवर 15 महिने, महिंद्रा XUV700 वर 11 महिने, किया केरेन्सवर 11 महिने, मारुती ब्रेझावर 9 महिने, किया सोनेटवर 9 महिन्यांपर्यंत वेटिंग पीरिअड आहे. Hyundai Creta वर 8 महिने आणि Maruti Grand Vitara वर 7 महिन्यांपर्यंत वेटिंग पीरिअड आहे. अशा परिस्थितीत, यापैकी कोणतेही मॉडेल खरेदी करण्यापूर्वी, डीलरकडून कारचा वेटिंग पीरिअड जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

हायक्रॉसची डिलिव्हरी सुरुToyota ने डिसेंबर 2022 मध्ये आपली नवीन Innova Highcross लाँच केली. मात्र, लॉन्च होण्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये त्याचे बुकिंग सुरू झाले. हे एकूण 5 ट्रिम्स G, GX, VX, ZX आणि ZX (O) मध्ये लाँच करण्यात आले आहे. VX, ZX आणि ZX (O) ट्रिम हायब्रिड इंजिनसह येतात. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 18.3 लाख रुपये आहे. तर, टॉप मॉडेलची किंमत 28.97 लाख रुपये आहे. कंपनीने गेल्या महिन्यात या कारची डिलिव्हरी सुरू केली. मात्र, 20 दिवसांपूर्वीपर्यंत या कारसाठी 1 वर्षाचा वेटिंग पीरिअड होता. आता तो वाढून दीड वर्ष झाला आहे. ही एमपीव्ही अनेक स्मार्ट ॲडव्हान्स्ड फीचर्सने सुसज्ज आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारमध्ये 6 एअरबॅगसह ADAS तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीToyotaटोयोटाMahindraमहिंद्रा