E20 पेट्रोलवर चालणारी वाहने आता भारतीय बाजारात दाखल होत आहेत. यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचाही समावेश आहे. E20 हा पेट्रोलचाच एक फॉरमॅट आहे. जो पेट्रोलपेक्षाही स्वस्त आहे. E20 पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल असते. 2025 पर्यंत हे प्रमाण डबल करण्याची योजना आहे. इथेनॉल मिक्स पेट्रोल बाजारात आणणारी जिओ-बीपी ही देशातील पहिली कंपनी आहे.
महत्वाचे म्हणजे, Jio-BP च्या निवडक पेट्रोल पंपांवर E20 पेट्रोल देखील उपलब्ध व्हायला सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत आपले वाहन E20 पेट्रोलला सपोर्ट करत असेल, तर आम्ही त्यासंदर्भात माहिती देत आहोत. तर जाणून घ्या 1 लिटर E20 पेट्रोलची किंमत...E20 इंधन म्हणजे काय?इथेनॉल (C2H5OH) हे एक जैव ईंधन आहे. जे साखर आंबवून तयार केली जाते. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी या जैव इंधनाचे पेट्रोलसोबत मिश्रण करण्यासाठी, भारताने इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रम सुरू केला आहे. जो E20 मध्ये 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलाचे मिश्रण दर्शवतो. E20 मधील 20 हा अंक पेट्रोलमधील मिश्रित इथेनॉलचे प्रमाण दर्शवतो. अर्थात ही संख्या जेवढी अधिक तेवढेच पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण अधिक
असं आहे 1 लिटर E20 पेट्रोलच्या किंमतीचं गणित - जिओ-बीपी निर्मित E20 पेट्रोलमध्ये 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल असते. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 96 रुपये एवढा आहे. 96 रुपयांनुसार 80% पेट्रोलची किंमत 76.80 रुपये होते. याचप्रमाणे इथेनॉलची किंमत 55 रुपये प्रति लिटरपर्यंत आहे. म्हणजेच रु.55 नुसार 20% इथेनॉलची किंमत रु.11 होते. म्हणजेच, एक लिटर E20 पेट्रोलमध्ये 76.80 रुपयांचे सामान्य पेट्रोल आणि 11 रुपयांचे इथेनॉल समाविष्ट आहे. अशा प्रकारे, एक लिटर E20 पेट्रोलची किंमत 87.80 रुपये एवढी होते. अर्थात सामान्य पेट्रोलच्या तुलनेत हे पेट्रोल 8.20 रुपयांनी स्वस्त आहे.