शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

खासदारच जेव्हा संसदेने केलेले कायदे पायदळी तुडवितात...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 6:32 PM

अनेकांना दादा, भाई असे भासणारे नंबर हवे असतात. तर अनेकांना व्हीआयपी नंबर हवे असतात.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच अव्वाच्या सव्वा दंड असलेले वाहन कायदा दुरुस्ती विधेयक संसदेत संमत केले आहे. मात्र, याच संसदेचे खासदार वाहन कायदे धाब्यावर बसविताना दिसत आहेत. वाहनाची नंबरप्लेट एका ठराविक फॉन्टमध्ये असणे याच नियमांनुसार बंधनकारक आहे. मात्र, हा नियम पायदळी तुडवत नवनियुक्त खासदारांनी केवळ 1 नंबर मोठ्या अक्षरात लिहिल्याने या महाशयांना नियम लागू होत नाहीत का, असा सवाल विचारला जात आहे. 

अनेकांना दादा, भाई असे भासणारे नंबर हवे असतात. तर अनेकांना व्हीआयपी नंबर हवे असतात. आरटीओही महसूल मिळविण्यासाठी हे नंबर विकते. मात्र, या लोकांकडून वाहन विभागाचे नियम सर्रास पायदळी तुडविले जातात. वेड्या वाकड्या अक्षरांमध्ये हे नंबर वाहनावर लावले जातात. सरकारने नेमून दिलेल्या फॉन्ट शिवाय ही अक्षरे असतात. असे केल्यास तुरुंगवारीचीही तरतूद या कायद्यामध्ये केली आहे. मात्र, कायदे बनविणाऱ्यांनाच या गोष्टीचे भान राहिलेले नसल्याचे या फोटोवरून दिसत आहे. 

आंध्रमध्ये प्रथमच वाय़एसआर काँग्रेसने घवघवीत यश मिळविले आहे. लोकसभेसोबतच विधानसभेतही मोठ्या संख्येने खासदार, आमदार पाठविले आहेत. याच पक्षाचे राजमंदरीचे नवनियुक्त खासदार मरगनी भरत राम यांच्या महागड्या कारचा क्रमांक TS 08 GC 0001 आहे. मात्र, त्यांनी नंबर आधीचे चीन शून्य उडवत 1 आकडा मोठ्या अक्षरात लिहिला आहे. तर TS 08 GC ही अक्षरे अत्यंत लहान अक्षरात लिहिली आहेत. यामुळे पूर्ण नंबरप्लेटवर 1 हा आकडाच दिसत आहे. एखादा अपघात किंवा गुन्हा घडल्यास कोणालाही हा नंबर ओळखता येणार नाही. 

मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हाफॅन्सी नंबरप्लेट लावणे काद्याने गुन्हा आहे. पोलीस अधून मधून ही मोहिम उघडतात. आरटीओने काही फॉन्टच अधिकृत केलेले आहेत. अशा नंबरप्लेट लावल्यास सध्या 100 रुपयांचा दंड आकारला जातो. तसेच या प्रकरणात एक पेक्षा जास्त वेळा पकडले गेल्यास 2000 रुपयांचा दंड आहे तसेच शिक्षाही होऊ शकते. प्रत्येक राज्यानुसार हा दंड बदलतो. 

टॅग्स :Jaguarजॅग्वारlok sabhaलोकसभाRto officeआरटीओ ऑफीसNitin Gadkariनितीन गडकरीMember of parliamentखासदार