शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

वाहनचालन शिकताना इंग्रजी एल अक्षराची लाल रंगातील प्लेट लावणे अत्यावश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 2:00 PM

वाहन चालवण्यासाठी शिकताना त्या वाहनावर इंग्रजीमध्ये 'एल' हे अक्षर रोमन लिपीमध्ये लाल रंगात असावे. ते का, कसे, नियमानुसार ते कसे लावावे, हे प्रत्येकाने समजून घ्यावे. त्याचा फायदा वाहन शिकताना नक्कीच होतो

ठळक मुद्देड्रायव्हिंग शिकताना कारवर इंग्रजी 'एल' अक्षर तयार केलेले वा चितारलेले असावे लागतेशिकणाऱ्या व्यक्तीच्या बाजूला पक्के लायसेन्स असणारी व्यक्ती असावी लागतेकार वा अन्य वाहनामुळे तुम्हाला अन्य वाहनचालकही एकप्रकारे सांभाळून घेत असतात

कार चालवण्यास शिकवण्यासाठी आज विशेष शाळा वा ड्रायव्हिंग स्कूल्स असतात. त्या ठिकाणी असलेल्या कार्समध्ये काही वेगळ्या प्रकारच्या अंतर्बाह्य बदल केलेले असतात. त्यामुळे वाहतुकीमध्ये अन्य वाहनांच्या चालकांना ती कार चालवणारा शिकावू आहे, हे झटकन समजते. ते का समजते, त्यामध्ये असणारा चालक हा ज्या पद्धतीने कार चालवत असतो, त्यावरून नव्हे तर त्या कारवर ड्रायव्हर शिकत आहे किंवा ड्रायव्हिंग स्कूलचे नाव त्यावर रंगवलेले आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कारवर पुढे व मागे लाल रंगाच्या स्टिकरमध्ये किंवा लाल रंगाने असलेले इंग्रजी 'एल' अक्षर तयार केलेले वा चितारलेले असते. वाहनचालन शिकवण्यासाठी सर्वच ठिकाणी काही ड्रायव्हिंग स्कूल्स असतात असे नाही, काही जण नावापुरते किंवा सोयीसाठी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जात असतात. अशावेळी त्यांना विशिष्ट दिवस त्या ड्रायव्हिंग स्कूलमधून प्रशिक्षण दिले जाते व त्या ड्रायव्हिंग स्कूलची वाहन शिकावू व्यक्तीला चालवण्यासाठी असलेली कार असते. त्यावर इंग्रजी 'एल' अक्षर तयार केलेले वा चितारलेले असते. पण ज्यावेळी तशी कार असत नाही, स्वतःची कार शिकण्यासाठी वापरीत असेल तर त्यावेळी त्या कारवर इंग्रजी 'एल' अक्षर तयार केलेले वा चितारलेले असावे लागते. किंवा या अक्षराचा स्टिकर लावावा लागतो. तसेच शिकणाऱ्या व्यक्तीच्या बाजूला पक्के लायसेन्स असणारी व्यक्ती असावी लागते. तसे पाहायला गेले तर काहींच्यादृष्टीने ही अतिशयनगण्य बाब असू शकते, एकाधा म्हणतो, त्याची काय गरज आहे. पण एक लक्षात घ्यायला हवे की, या इंग्रजी 'एल' अक्षर तयार केलेले वा चितारलेल्या कार वा अन्य वाहनामुळे तुम्हाला अन्य वाहनचालकही एकप्रकारे सांभाळून घेत असतात, तुमच्यापासून दोन हात लांब राहून का होईना, तुम्हाला एकप्रकारे मदत करीत असतात. लांबून हे इंग्रजी 'एल' अक्षर दिसल्याने वा लक्षात आल्याने वाहतूक पोलीसही तुम्हाला घाई करून जाण्यास सांगत नाही, सांभाळून घेऊन तुम्हाला मार्गदर्शनही करतो.केवळ कारच नव्हे तर स्कूटर वा मोटारसायकल चालवण्यासाठी तुम्ही ज्यावेळी त्याचे शिक्षण घेत असता त्यावेळी ते स्पष्ट होणे दुसऱ्याला लक्षात येण्यासाठी व तुमच्याही फायद्यासाठी गरजेचे असते. कोणत्याही शिकावू वाहन चालकाने त्याच्या बरोबर पक्के वाहनचालन परवाना असलेल्या व्यक्तीशिवाय वाहन चालवता कामा नये, तसा नियम आहे व कायदाही आहे. परंतु, केवळ त्यासाठी नव्हे तर तुम्हाला वेळप्रसंगी तीच व्यक्ती मदत करू शकते. इतकेच नव्हे तर एल या इंग्रजी अक्षरामुळे तुमच्या बरोबर शिकवणाऱ्या व्यक्तीलाही अन्य वाहनचालक, पोलीस यांचे सहकार्य होते. परस्परांच्या या सहकार्यामधून वाहन चालन शिकणे हे सुकरही बनत असते.इंग्रजी 'एल' अक्षर कशा आकारात असावे तर 'एल' चा उभा आकार ११ इंच उंच, खालील बाजू साडेसात इंच रूंद, त्या 'एल'ची उजवी बाजू खालील अंगाने उभी- अडीच इंच उंच वरील बाजूवरील रूंदी अडीच इंच रूंद असे असावे. हे एल अक्षर पांढऱ्या रंगाच्या पत्र्यावर लाल रंगामध्ये चितारलेले असावे. नियमानुसार हे जरी असले तरी आज काही वाहनांवर शिकावू चालक हे स्टिकरचा वापर करीत असतात. नियमात ते नाही, पण त्याचा वापर करू दिला जातो, हे वाहतूक पोलिसांचे सौजन्यच असते, हे लक्षात घ्यावे.

टॅग्स :AutomobileवाहनAccidentअपघात