शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सेल्फ ड्रायव्हिंग कारचा अपघात झाल्यास शिक्षा कोणाला?, जाणून घ्या नियम काय सांगतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 10:39 AM

ऑटोमोबाईल उद्योग खूप वेगाने विकसित होत आहे यात शंका नाही. रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. ऑटोनॉमस कार यापैकीच एक.

ऑटोमोबाईल उद्योग खूप वेगाने विकसित होत आहे यात शंका नाही. रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. ऑटोनॉमस कार यापैकीच एक. त्यांना सेल्फ ड्रायव्हिंग कार असेही म्हणतात. अशा कारची सध्या बाजारात मोठी चर्चा आहे. त्यात प्रामुख्याने टेस्ला, फोर्ड आणि ॲपलसारख्या कंपन्यांच्या नावांचा समावेश होतो. पण या गाड्यांबाबतचा सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे, सेल्फ ड्रायव्हिंगवेळी अपघात झाल्यास जबाबदार कोण - कार कंपनी की चालक? चला, तर मग जाणून घेऊया....

ऑटोनॉमस किंवा सेल्फ ड्रायव्हिंग कार अशा कार चालवण्यासाठी ड्रायव्हरची आवश्यकता नाही. यासाठी अशा गाड्यांमध्ये अल्ट्रासोनिक सेन्सर असतात. या सेन्सर्सद्वारे मिळणारी माहिती केबिनमधील कॉम्प्युटर डिस्प्ले, पॉवरट्रेन व कॅमेऱ्यांना दिली जाते.

अपघात झाल्यास कोणाला शिक्षा? - ऑटोपायलट मोडमध्ये सर्व नियंत्रण कारच्या एआय सिस्टिमकडे असते, आपात्कालीन परिस्थितीत फक्त ड्रायव्हरला निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. - ऑटोपायलट तंत्रज्ञानाला शिक्षा होऊ शकत नाही आणि ड्रायव्हर तर गाडी चालवत नव्हता. अशा परिस्थितीत प्रामुख्याने चालकाला शिक्षा होते. अपघातासाठी ड्रायव्हरला जबाबदार धरले जाते कारण ज्या देशांमध्ये सेल्फ-ड्रायव्हिंग वाहनांना परवानगी आहे, तेथे काही नियम आहेत. - अशा कारमध्ये ड्रायव्हरने गाडी चालवताना नेहमी स्टेअरिंगवर हात ठेवणे आवश्यक आहे. त्याने नेहमी लक्ष देणेही गरजेचे आहे जेणेकरून तो अपघातसमयी नियंत्रण मिळवू शकेल. यूकेमध्ये अशा अपघातात दोषी आढळलेल्या चालकाला तुरुंगवासही होऊ शकतो, पण त्याचवेळी जर तंत्रज्ञानात दोष असेल तर कार कंपनीविरोधात कोर्टात धाव घेता येते. 

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योग