भारतात आता कारमध्ये दोन एअरबॅग बंधनकारक केले आहेत. नवीन गाड्यांमध्ये ड्रायव्हरसह शेजारच्या पॅसेंजरलाही एअरबॅगची सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारने पाऊले उचलली आहेत. आपल्याकडे काही कारमध्ये सहा एअरबॅगही देण्यात येतात. मात्र, अनेकदा आपण ऐकतो की अपघात झाला पण एअरबॅगच उघडली नाही, कंपन्यांनी फसविलेपासून ते कारमध्ये फॉल्ट असल्याचे ठोकताळे बांधले जातात. मात्र एअरबॅग न उघडण्याची काही कारणे आहेत.
एअरबॅगचे काम असे असते की अपघात झाला की कारचालकाचे डोके समोरच्या भागावर आदळू नये. ते आदळण्याआधीच सेन्सरव्दारे बॅग उघडते आणि ती चालकाच्या डोक्याच्या आणि स्टेअरिंगच्या मध्ये येते. यामुळे दुखपतीपासून वाचायला होते. पण ही एअरबॅगच जर उघडली नाही तर मग कपाळमोक्ष ठरलेला असतो.
ज्या प्रकारे तुम्ही काही महिन्यांनी तुमची कार सर्व्हिसिंगक करून घेता, तशीच एअरबॅगलाही सर्व्हिसिंगची गरज असते. जर कारमधील एअरबॅगची काळजी घेतली नाही तर काही वर्षांनी ती खराब होते. यामुळे जेव्हा गरज भासते तेव्हा ती योग्य प्रकारे उघडते असे नाही. अनेकदा अशा कारमधील एअरबॅग उघडत नाहीत. या एअरबॅगचे सेन्सर चालू आहेत का, या सारख्या गोष्टी तपासण्याची गरज असते.
प्रोटेक्टिव ग्रिलआजकाल कारमध्ये प्रोटेक्टिव्ह ग्रील लावले जाते. अनेकजण कारचे नुकसान होऊ नये म्हणून गार्ड लावतात. यामुळे अनेकदा अपघातावेळी एअरबॅग उघडत नाही. या गार्डमुळे पुढच्या सेन्सरला कळतच नाही की अपघात झाला आहे. समोरून आदळणारे वाहन किंवा वस्तू त्या सेन्सरला टच न झाल्याने एअरबॅग उघडत नाही मात्र, आदळण्याचा दणका आतमध्ये बसलेल्यांना बसतो.
खराब एअरबॅगकंपन्या नव्या कारमध्ये एअरबॅग देतात खऱ्या, परंतू त्या सुस्थितीत असतात की खराब ते अनेकदा कळत नाही. ते समजण्यासाठी आपली गाडी तर कशावर कोणी आदळणार नाही. यामुळे अपाघात होताच एअरबॅग सुस्थितीत असेल तर उघडेल नाहीतर ती जाम होईल. यामुळे एअरबॅगची तपासणी गरजेची आहे.
बनावट एअरबॅगअनेक कारमध्ये एकच एअरबॅग असते. यामुळे मॉडेलमध्ये पैसे वाचवून कार घेतल्यानंतर अनेकजण बाहेरून एअरबॅग बसवून घेतात. ही एअरबॅग स्वस्तच असते. म्हणजेच बनावट. ही एअरबॅग त्या पद्धतीने काम करत नाही ज्या पद्धतीने ओरिजनल एअरबॅग काम करते. यामुळे नेहमी चांगल्या प्रतीची एअरबॅग खरेदी करावी.