- चंद्रकांत दडस
मोटार वाहन कायदा, १९८८ नुसार, सर्व वाहनमालकांना थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे अनिवार्य आहे. सरकारने थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी नवे नियम केले आहेत, त्यामुळे नुकसान भरून निघणार आहे. हा स्टँड अलोन ऑन डॅमेज इन्शुरन्स म्हणून ओळखला जातो. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इर्डा)नुसार, सप्टेंबर २०१८ नंतर खरेदी केलेली कोणतीही कार ऑन डॅमेज इन्शुरन्ससाठी पात्र आहे. हा विमा मुळातच पहिल्या पार्टीला त्यांच्या वाहनाला झालेल्या नुकसानापासून वाचविण्यासाठी आहे.
तुम्हाला आणि तुमच्या वाहनाला मिळणाऱ्या कव्हरेजसाठी स्टँड अलोन पॉलिसी महत्त्वाची आहे. अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ती, आग किंवा मानवनिर्मित आपत्ती यामुळे होणारे कोणतेही नुकसान या पॉलिसीअंतर्गत समाविष्ट केले जाते.
नेमके काय कव्हर होते?अपघात : हा इन्शुरन्स अपघात किंवा धडकेमुळे झालेल्या नुकसानीला कव्हर करेल.आग व स्फोट : आग किंवा स्फोटामुळे वाहनाचे नुकसान देखील विम्यातसमाविष्ट आहे.चोरी : तुमच्यावर कारच्या चोरीमुळे मोठा आर्थिक भार पडू शकतो, परंतु जर तुमच्याकडे हा विमा असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यात तुमचे नुकसान भरून निघेल.दुर्घटना : नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप, पूर किंवा दंगली आणि विध्वंस या मानवनिर्मित घटना या पॉलिसीत कव्हर होतात.काय कव्हर होत नाही?इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलब्रेकडाऊन कव्हर.युद्ध, आक्रमण किंवा बंडामुळे होणारे नुकसान.नशेमध्ये वाहन चालविल्यास.जर अपघात झाला आणि पॉलिसीचे नूतनीकरण केले गेले नसेल तर.जाणूनबुजून झालेले नुकसानवैध ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवल्यामुळे होणारे नुकसान भरून काढले जात नाही.