शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

मारुतीने का घेतली डिझेलमधून एक्झिट? ही आहेत तीन मुख्य कारणे

By हेमंत बावकर | Published: April 26, 2019 9:29 AM

मारुती आजवर फियाटची इंजिने वापर होती. यामुळे मारुतीला संशोधनावर पैसा गुंतवावा लागत नव्हता. तरीही मोठा महसूल हा फियाटला जात होता. यामुळे मारुतीन 5-6 वर्षांपूर्वीच स्वत:ची इंजिने विकसित करण्याचा निर्णय घेतला.

- हेमंत बावकर 

मुंबई : देशातील सर्वात मोठी कारनिर्मिती करणारी कंपनी मारुती सुझुकीने डिझेल कार विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे वाहनप्रेमींसह उद्योगविश्वामध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, यामागच्या कारणांचा विचार केल्यास मारुतीचा निर्णय योग्य वाटतो. आर्थिक गणितांबरोबर मारुतीने सरकारी नियमावलींमुळे होणाऱ्या परिणामांची सांगड घातली आहे. 

तसे पाहता मारुती आजवर फियाटची इंजिने वापर होती. यामुळे मारुतीला संशोधनावर पैसा गुंतवावा लागत नव्हता. तरीही मोठा महसूल हा फियाटला जात होता. यामुळे मारुतीन 5-6 वर्षांपूर्वीच स्वत:ची इंजिने विकसित करण्याचा निर्णय घेतला. या काळात मारुतीने आजवर फियाटचीच 1.3 मल्टीजेट इंजिन वापरली. हे इंजिन कमालीचे यशस्वीही होते. मायलेज, परवडणारे आणि जास्त मेन्टेनन्स न देणारे असे हे इंजिन होते. यामुळे मारुतीने सरसकट सर्व गाड्यांमध्ये हे इंजिन दिले होते. मारुतीची डिझेल कारची विक्री पाहता एकूण विक्रीपैकी निम्म्याहून जास्त कार या डिझेलच्या आहेत. यामुळे लाखो कोटींचा महसूल हा फियाटला द्यावा लागत होता. यामुळे मारुतीने तेव्हा 1700 कोटी रुपये गुंतवून गुरगावमध्ये डिझेल इंजिन बनविण्याचा प्रकल्प उभारला. यामध्ये कंपनीचे हजारो कोटी रुपये गुंतलेले आहेत. असे असताना भारत सरकारने एकाएकी डिझेलच्या कार 2030 पर्यंत बंद करण्याचा आणि सीएनजी, वीजेवर चालणाऱ्या कार विक्री करण्याचा निर्णय घेतला. याचा पहिला फटका मारुतीच्या भविष्यातील वाढीवर बसला. मारुतीने या काळात 1.5 लीटरचे इंजिन विकसितही केले. हे इंजिन एस क्रॉस, सियाझ या कारमध्ये देण्यात आले आहे. मात्र, एवढा मोठा खर्च करून हे इंजिन काही काळानंतर कालबाह्य होणार याची धास्ती कंपनीला आहे. यातच बीएस 6 उत्सर्जन नियमावलीचे डिझेल इंजिन बनवायचे झाल्यास सध्याच्या बीएस 4 इंजिनापेक्षा त्याची किंमत 2.50 लाख रुपयांनी जास्त असणार आहे. यामुळे सहाजिकच ग्राहकवर्ग पेट्रोलच्या कारपेक्षा 2.5 लाख रुपयांनी जास्त किंमत असलेल्या कारकडे कसा वळणार? हा ही विचार कंपनीने केला आहे. 

महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्या पेट्रोल डिझेलचे चढे भाव हे ही एक मोठे कारण यामागे आहे. काही वर्षांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलमधील किमतीमध्ये 20 ते 25 रुपयांचे अंतर होते. आज हेच अंतर सहा-सात रुपयांवर आले आहे. भविष्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमती समपातळीवर येतील. यामुळे 2-4 किमीच्या मायलेजसाठी कोणी जादाचे 2.5 लाख रुपये देण्याचे धारिष्ट्य दाखवेल असे वाटत नाही. कारण हा जादाचा पैसा आणि त्यावरील व्याज याचा विचार करता हे पैसे वसूल होण्यासाठी 10 ते 12 वर्षे लागतील. यामुळे भविष्यात डिझेलची कार घेणे हा आतबट्ट्याचाच व्यवहार ठरणार आहे. 

यापेक्षा पेट्रोल कारलाचा 50-60 हजार रुपये मोजून सीएनजीची कार घेतल्यास त्याचा पर्यावरणावर आणि पर्यायाने खर्चावर फायदा होणार आहे. सध्या सीएनजी फक्त मेट्रो शहरांमध्येच उपलब्ध असला तरीही येत्या दोन वर्षांत तो अन्य ठिकाणीही मिळण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरु आहेत. विजेवर चालणाऱ्या वाहनांनी अद्यापही बाळसे धरलेले नाही. यामुळे सध्यातरी पुढील 10-12 वर्षांसाठी सीएनजीचाच पर्याय कंपनीसमोर आहे. आणि आता बाजारात मारुतीच्या सीएनजी कारनी चांगलेच बस्तान बसविले आहे. यामुळे मारुतीने खर्चात कपात करण्यासाठी 1 एप्रिल 2020 पासून डिझेल कार विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पेट्रोल कार घ्यायची की डिझेल? प्रश्न पडतोय का... वाचा...

फोक्सवॅगनचाही निर्णय

असे करणारी मारुती ही एकटीच कंपनी नसून काही महिन्यांपूर्वी फोक्सवॅगन कंपनीनेही 2024 पासून पेट्रोल, डिझेलच्या कार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आता वाहनक्षेत्र नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर असल्याने अन्य कंपन्यांकडूनही हे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीPetrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंप