नवी दिल्ली : सौदीच्या राजाने आज अचानक कच्च्या तेलाच्या किंमती कमी करून जगालाच आश्चर्याचा धक्का दिला. यामुळे शेअर बाजारातही भूकंप अनुभवायला मिळाला. गुंतवणूकदारांचे तब्बल ५ लाख डॉलरचे नुकसान झाले असले तरीही मोठी आनंदाची बातमी आहे. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने भारतात आज 76 रुपयांना असणारे पेट्रोल थेट 50 रुपयांवर घसरू शकते.
पेट्रोल, डिझेलसह अन्य पेट्रोलियम पदार्थांची आयात करणारा भारत हा चीननंतर सर्वात मोठा देश आहे. यामुळे भारताची परकीय गंगाजळी मोठ्या प्रमाणावर खर्च होते. या किंमत कपातीचा फायदा देशाच्या तिजोरीलाही होणार असून असे झाल्यास त्याचा थेट फायदा वाहन चालकांनाही मिळण्य़ाची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती तबब्ल 30 टक्क्यांनी घसरल्या. सौदी अरेबियाने आज कच्च्या तेलाच्या किंमती कपात केल्याने हे घडले आहे. सौदीने रशियाचा बदला घेतला आहे. सौदीने तेलाचे उत्पादन घटविण्याची विनंती रशियाला केली होती. मात्र, रशियाने काडीचाही भाव न दिल्याने सौदीने तेलाचे भावच कमी करून टाकले आहेत. या दोघांमधील शीतयुद्ध असेच काही काळ सुरू राहिले तर त्याचा थेट फायदा लोकांपर्यंत पोहोचणार आहे.
नवलच! अख्खा बाजार गडगडला, पण Yes Bank चा शेअर वाढला
Yes Bank : अंबानींच्या बाजूलाच राणा कपूरचा राजवाडा; देशातील 10 महागड्या घरांमध्ये समावेश
भन्नाट ऑफर! 300Mbps चा वेग, सोबत अनलिमिटेड डेटा; Jio ला करणार का टाटा?
Yes Bank च्या राणा कपूरला आरबीआयने असे ब्रिटनमधून 'उचलले'
भारताच्या क्रूड बास्केटची किंमत प्रति बॅरल 47.92 डॉलर आहे. म्हणजेच भारताला एका बॅरलसाठी 3530.09 रुपये खर्च करावे लागतात. अशा स्थितीत जर 30 टकक्यांनी कपात झाली तर भारताचे जवळपास 1000 रुपये वाचणार आहेत. म्हणजेच पुढील खरेदीवेळी बॅरल 2470 रुपयांना मिळणार आहे. सरकारने सर्वसामान्यांना लाभ द्यायचे ठरविल्यास पेट्रोल पुढील काही दिवसांत 50 रुपयांत मिळणार आहे.