नवी दिल्ली : सध्या इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढली आहे. मार्केटमध्ये अनेक जण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये Wroley Platina इलेक्ट्रिक स्कूटर सध्या चर्चेत आहे, जी कमी किमतीत जास्त रेंजसह आकर्षक डिझाइनसाठी पसंत केली जाते. Wroley Platina ही एक मिड रेंजची इलेक्ट्रिक स्कूटर आहे. याच्या किंमतीसह, रेंज, टॉप स्पीड, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती जाणून घ्या...
Wroley Platina Priceया इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत 73,700 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी ऑन-रोड 77,361 रुपयांपर्यंत जाते.
Wroley Platina Battery and Motorया इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दिलेला बॅटरी पॅक 60V, 30Ah क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक आहे आणि या बॅटरीमध्ये 250W पॉवरची BLDC मोटर बसवण्यात आली आहे. या बॅटरी पॅकच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर ही बॅटरी 4 तासांत फूल चार्ज होते.
Wroley Platina Range and Top Speedरेंजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर एकदा फूल चार्ज केल्यानंतर 90 किलोमीटरची रेंज देते आणि या रेंजसह, ताशी 25 किलोमीटरचा टॉप स्पीड मिळतो.
Wroley Platina Braking Systemस्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने स्कूटरच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिला आहे, ज्यामध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम जोडण्यात आली आहे. तसेच, सस्पेन्शन सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, पुढील बाजूस हायड्रॉलिक डॅम्पिंग सस्पेंशन सिस्टीम आणि मागील बाजूस स्प्रिंग बेस्ड शॉक ऍब्जॉर्बर सिस्टीम बसविण्यात आली आहे.
Wroley Platina Featuresप्लॅटिना इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने चार्जिंग पॉइंट, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, अँटी थेफ्ट अलार्म, क्रूझ कंट्रोल, डिजिटल फ्युएल गेज, एलईडी हेड लाईट, एलईडी टेल लाईट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प, अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर यांसारखी फीचर्स दिली आहेत.