Xiaomi Electric Car : स्मार्टफोनच्या दुनियेत धुमाकूळ घातल्यानंतर Xiaomi कंपनी आता इलेक्ट्रिक कार क्षेत्रातही उतरणार आहे. चीनमधील सर्वात मोठी फोन निर्मिती कंपनी आता 'Xiaomi EV' नावाच्या इलेक्ट्रिक कार कंपनीसाठी नोंदणी केली आहे. कंपनीने ऑगस्टच्या शेवटी आपल्या EV युनिटची व्यवसाय नोंदणी पूर्ण केली. (Xiaomi will Launch its First Electric Car in 2024)
दरम्यान, Xiaomi च्या या घोषणेनंतर इलेक्ट्रिक कार उद्योगात खळबळ उडाली आहे. कारण स्मार्टफोनच्या जगातही Xiaomi ने अनेत कंपन्यांना टक्कर दिली होती. भारतातील स्मार्टफोनच्या विश्वात Xiaomi चे स्मार्टफोन अव्वल स्थानावर आहेत. Xiaomi चे Redmi स्मार्टफोन आणि Mi स्मार्टफोन हे भारतातील बेस्ट सेलर्स आहेत. दरम्यान, कंपनीच्या इलेक्ट्रिक कार निर्मितीच्या घोषणेनंतर, अशी चर्चा आहे की, Xiaomi नक्कीच ईव्ही क्षेत्रात मोठा बदल घडवून आणेल.
2024 मध्ये येणार Xiaomi Electric Carकंपनी 2024 च्या पहिल्या सहामाहीत त्यांच्या कारचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करेल, असे Xiaomi Corp चे सीईओ लेई जून यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तर रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, एका कार्यक्रमात सीईओ लेई जूनच्या घोषणांनी मीडियातील चर्चेनंतर सांगितले की, कंपनीने इलेक्ट्रिक कारच्या जगात प्रवेश करत असल्याची पुष्टी केली.
कंपनी पुढील 10 वर्षांमध्ये नवीन इलेक्ट्रिक कार विभागात 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल, असे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, ऑटो इंडस्ट्रीमध्ये अशी चर्चा आहे की, Xiaomi नेहमी कमी किंमतीत चांगले फीचर्स असलेली उत्पादने ऑफर करत असल्याने, त्यांची कार कमी किमतीची आणि सुंदर दिसणारी देखील असू शकते. भारतातील इलेक्ट्रिक कारचे बाजार अद्यापही त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि आगामी कंपन्यांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.
तयारी जोरातXiaomi ने इलेक्ट्रिक कार युनिटसाठी लोकांची नियुक्ती करण्याचे काम देखील वेगात सुरू केले आहे. लवकरच कंपनी आपल्या कारचे उत्पादन कोठे करेल आणि त्याचे भागीदार कोण असेल? हे देखील उघड करेल. याशिवाय, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही प्रमाणे Xiaomi ची इलेक्ट्रिक कार देखील इतर कंपन्यांच्या कारच्या तुलनेत खूपच स्वस्त असतील.