जपानी दुचाकी निर्माता कंपनी यामाहाने भारतीय बाजारात नवे पाऊल टाकले आहे. चार बाईकचे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. एवढे अपडेट की फोर व्हीलरमध्ये येत असलेले ट्रॅक्शन कंट्रोल, मोबाईल कनेक्टिव्हीटीसह मोदींनी नुकत्याच लाँच केलेल्या ई२० फ्युअलवर देखील या बाईक चालणार आहेत.
कंपनीने आपल्या सर्वाधिक पसंतीच्या बाइक्सची नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. FZS ची चौथी पिढी भारतात लाँच झाली आहे. कंपनीने 149 सीसी फ्युएल इंजेक्टेड इंजिन दिले आहे. कंपनीने अधिक प्रकाश देणारा नवीन हेडलाइट दिला आहे, त्यासोबत एलईडी फ्लॅशर्स देखील दिले आहेत. ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टमसह, कंपनीने एक नवीन LCD स्क्रीन देखील दिली आहे, ज्यामध्ये वाय कनेक्ट आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.
स्क्रीनवरच मोबाईल कनेक्शन स्टेटस, बॅटरी स्टेटस, कॉल अलर्ट आणि एसएमएस अलर्ट मिळतील. याचसोबत इंधन वापर, मेंटेनन्स अलर्ट, रेव्ह डॅशबोर्डची माहिती मोबाईलवर पाहता येणार आहे. या बाईकची एक्स शोरुम किंमत 1.27 लाख रुपये आहे. दिल्लीतील FZ FI आवृत्ती-3 ची एक्स-शोरूम किंमत 1.15 रुपये ठेवण्यात आली आहे.
कंपनीने FZ सीरीजची नवीन X बाईकही लॉन्च केली आहे. ज्या ग्राहकांना थोडे थोडे थांबून कमी अंतराचा प्रवास करायचा असतो, त्यांच्यासाठी ही बाईक आहे. म्हणजेच डिलिव्हरी बॉय, पेपर टाकणारे, दूध टाकणारे आदी लोक या बाईकचा वापर करू शकतात. बाईकचे डिझाईन रेट्रो बाईकसारखे ठेवण्यात आले असून त्यात 149 cc फ्युएल इंजेक्टेड इंजिन आहे. एलईडी टर्न इंडिकेटर, डीआरएलसह बाय-फंक्शन एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेललाइट, मेटल टँक कव्हर, मेटल साइड कव्हर, एलसीडी मीटर, मेटल अंडर काउल, दोन- लेव्हल सीट, मोबाईल चार्जिंगसाठी पॉवर सॉकेट, कॉल अलर्ट, एसएमएस आणि ई-मेल अलर्ट, अॅप कनेक्टिव्हिटी स्टेटस, फोन बॅटरी लेव्हल स्टेटस यासारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.
बाईक डार्क मॅट ब्लू (रु. 1.37 लाख-दिल्ली), मॅट कॉपर, मॅट ब्लॅक (1.36 लाख-दिल्ली) च्या किंमती ठेवण्यात आल्या आहेत.
यामाहाने MT-15 अपडेटसह लॉन्च केली आहे. 155 सीसी इंजिनसह VVA तंत्रज्ञान देण्यात आले आहे. ड्युअल चॅनल एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, एलईडी टर्न इंडिकेटर, अपसाइड डाउन फ्रंट फोर्क, युनि-लेव्हल सीटसह ग्रॅब बार, असिस्ट आणि स्लिपर क्लच, अॅडव्हान्स्ड पूर्ण डिजिटल एलसीडी मीटर देण्यात आले आहेत. वाय कनेक्ट अॅपद्वारे या सर्व बाईक कनेक्ट असणार आहेत. ही बाईक 1.68 लाख रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात आली आहे.