रेट्रो स्टाईलिंग आणि मॉडर्न फीचर्सच्या प्रेमींसाठी, हे सुवर्ण युगाकडे परतण्यापेक्षा कमी नाही. तुम्ही जे वाचताय ते अगदी खरंय. तुम्हाला 80 च्या दशकातली Yezdi ही बाईक नक्कीच आठवत असेल. ही बाईक आता पुन्हा नव्या रूपात रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज होत आहे. क्लासिक लीजेंड्स Jawa नंतर आता Yezdi हा ब्रांड भारतात पुन्हा लाँच होण्यच्या तयारीत आहे. या वर्षाच्या सुरूवातीला कंपनीच्या एक स्क्रॅबल बाईकला स्पॉट करण्यात आलं होतं. ती बाईक Roadking या नावानं लाँच होण्याची शक्यता आहे. आता कंपनीचं आणखी एक मॉडेल टेस्ट दरम्यान स्पॉट करण्यात आलं आहे.
महिंद्रा अँड महिंद्राच्या (Mahindra and Mahindra) मालकीच्या क्लासिक लीजेंड्सने काही महिन्यांपूर्वी देशात रोडिंगच्या नावानं ट्रेडमार्क दाखल केला होता. असं मानलं जातं की हे नाव स्क्रॅम्बलर मॉडेलसाठी वापरलं जाईल. त्याचबरोबर कंपनीनं भारतातील दुसरं मॉडेल म्हणून अॅडव्हेंचर टूरर मॉडेल सादर केलं जाईल.
अलीकडच्या काळात भारतीय बाजारपेठेत ग्राहकांचा कल हा अॅडव्हेन्चर स्टाईल्स असलेल्या बाईककडे असल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतर आता त्यासोबतच रेस्ट्रो स्टाईललाही ग्राहकांची पसंती मिळत आहेय या सेगमेंटमध्ये हीरो मोटोकॉर्पपासून रॉयल एन्फिल्ड पर्यंत अनेक कंपन्यांनी आपल्या बाईकची मॉडेल्स सादर केली आहेत. दरम्यान, Yezdi अॅडव्हेन्चर बाईक्सची आवड असलेल्या तरूणांना आकर्षित करण्य़ाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
व्हिडीओ आला समोरयुट्यूब चॅनेल सुयोग (SUYOG) ने या नवीन बाईकचा व्हिडीओ अपलोड केला आहे. हे प्रोटोटाइप मॉडेलसारखे दिसत असले तरी, या बाईकची फ्रेम आणि हँडलबार इत्यादी आता प्रोडक्शन मॉडेलसारखं वाटत नाही. दरम्यान, यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह प्रीमियम वैशिष्ट्ये समाविष्ट केली जाऊ शकतात अशी अपेक्षा आहे.
या बाईकच्या इंजिन आणि पॉवरट्रेनबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु असं मानलं जातं की यामध्ये कंपनी 293cc क्षमतेचे लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन वापरू शकते. जे जावाच्या बाईक्समध्येही दिसून येते. हे इंजिन 27.33 PS पॉवर आणि 27.02 Nm टॉर्क जनरेट करते. या व्यतिरिक्त, दुसरे इंजिन एक पर्याय म्हणून पाहिले जात आहे, त्यात 334cc इंजिन देखील दिलं जाऊ शकतं. ही दोन्ही इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्ससह येतात.