नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप Zelio Ebikes ने भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव Zelio X Men असे आहे. कंपनीने या स्कूटरचे एकूण तीन व्हेरिएंट्स मार्केटमध्ये आणले आहेत. ग्राहकांना ही स्कूटर व्हाइट, ब्लॅक, रेड आणि सी ग्रीन कलरमध्ये खरेदी करता येईल.
या इलेक्ट्रिक स्कूटरच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये कंपनीने 60/72V BLDC मोटर दिली आहे. ही स्कूटर खूप लाइटवेट आहे. या स्कूटरच वजन 80 किलोग्राम आहे, असा कंपनीचा दावा आहे. ही स्कूटर 180 किलोपर्यंत वजन उचलू शकते. तसेच, या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 64 हजार 543 रुपये (एक्स-शोरूम) सुरु होते. या स्कूटरच्या टॉप वेरिएंटसाठी 87 हजार 573 रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील.
सर्व व्हेरिएंट्सची ड्रायव्हिंग रेंज डिटेल्स- बेस व्हेरिएंटमध्ये 60V/32AH लेड-एसिड बॅटरी देण्यात आलीय. ही बॅटरी चार्ज होण्यासाठी 7 ते 8 तासांचा वेळ लागतो. या स्कूटरच बेस व्हेरिएंट फुल चार्जमध्ये 55 ते 60 किलोमीटर रेंज असणार आहे.
- दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 72V/32AH लेड-एसिड बॅटरी आहे. ही स्कूटर चार्ज होण्यासाठी 7 ते 9 तासांचा वेळ लागतो. ड्रायविंग रेंजबद्दल बोलायच झाल्यास, फुल चार्ज झाल्यानंतर स्कूटर 70 किलोमीटरपर्यंत पळू शकते.
- टॉप मॉडलमध्ये 60V/32AH लिथियम-ऑयन बॅटरी देण्यात आली आहे. फुल चार्ज होण्यासाठी 4 तासांचा वेळ लागतो. एकदा फुल चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर 80 किलोमीटरपर्यंत रेंज देऊ शकेल.
काय आहेत फीचर्स? ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला एंटी-थेफ्ट अलार्म, रियर ड्रम ब्रेक, फ्रंट डिस्क ब्रेक आणि अलॉय व्हील्स सोबत मिळेल. त्या शिवाय, यात रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच, यूएसबी चार्जर, हायड्रोलिक शॉक एब्जॉर्बर, सेंट्रल लॉकिंग आणि डिजिटल डिस्प्ले सारखे खास फीचर्स मिळतील.