भारतात आता कारच्या सेफ्टी रेटिंगकडे लोक लक्ष देऊ लागले आहेत. याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. परंतू, तरीही आज देशात सर्वाधिक शून्य किंवा कमी सेफ्टी रेटिंग असलेल्याच कार विकल्या जात आहेत. यात आता आणखी एका कंपनीच्या कारची भर पडली आहे. भारतात काही महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या सिट्रॉएन सी३ या कारची सेफ्टी रेटिंग आली आहे.
Citroen C3 Review: सिट्रॉइन C3 रिव्ह्यू: सात लाखांत एसयुव्हीची मजा की सजा? नवा पर्याय वापरायचा की...
ही सेफ्टी रेटिंग ग्लोबल एनकॅप नाही तर लॅटीन एनकॅपची आहेत. Citroen C3 ला Latin NCAP मध्ये शून्य स्टार मिळाले आहेत. ब्राझीलमध्ये बनविण्यात आलेल्या या कारला क्रॅश टेस्टमध्ये झिरो स्टार मिळाले आहेत. Citroen C3 ने प्रौढ प्रवासीसी संरक्षणात 12.21 गुण, लहान मुलांच्या संरक्षणात 5.93 गुण, पादचारी आणि असुरक्षित रस्ता वापर संरक्षणात 23.88 गुण आणि सेफ्टी असिस्ट सिस्टममध्ये 15 गुण मिळवले आहेत.
इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, डुअल फ्रंट एयरबॅग, सीटबेल्ट लोड लिमिटर्स, ISOFIX चाइल्ड-सीट माउंट आणि सीट बेल्ट रिमाइंडर सारख्या फिचर्स असलेल्या कारची चाचणी घेण्यात आली आहे. आता ही कार भारतीय आणि ब्राझीलमध्ये एकसारखीच आहे की वेगळी आहे, हे कंपनीने स्पष्ट केलेले नाहीय.
भारतात विकल्या जाणाऱ्या सिट्रॉएन सी ३ मध्ये ड्युअल एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्यूशन, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, पार्किंग सेन्सर्स, चाईल्ड लॉक, इंजिन इमोबिलायझर आणि हाय-स्पीड अलर्ट सारखी सुरक्षा फिचर्स आहेत. तर वरच्या व्हेरिअंटमध्ये स्पीड-सेन्सिटिव्ह ऑटो डोअर लॉक, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड असिस्ट, रिअर पार्किंग कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम आहे.